ETV Bharat / bharat

माझ्याकडे एकच 'मतदान कार्ड'; गौतमचे 'गंभीर' आरोपावर सुनावणीपूर्वीच स्पष्टीकरण - Tis Hazari court

नुकताच भाजमध्ये प्रवेश केलेला माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर २ मतदान कार्ड असल्यावरून गोत्यात सापडला आहे. त्याच्या विरोधात दिल्लीच्या तीसहजारी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. बुधवारी या प्रकरणावर तीसहजारी न्यायालयात सुनावणी होईल

गौतम गंभीर
author img

By

Published : Apr 30, 2019, 6:50 PM IST

नवी दिल्ली - दोन मतदान कार्ड प्रकरणावर माजी क्रिकेटर आणि भाजपच्या पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार गौतम गंभीरने उत्तर दिले आहे. आपल्याजवळ एकच मतदान कार्ड असून तो राजेंद्र नगर मतदारसंघाचा आहे, असे त्याने स्पष्ट केले आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिशी यांनी गंभीरजवळ २ मतदार कार्ड असल्याचा आरोप केला होता.

नुकताच भाजमध्ये प्रवेश केलेला माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर २ मतदान कार्ड असल्यावरून गोत्यात सापडला आहे. त्याच्या विरोधात दिल्लीच्या तीसहजारी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. हा खटला आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिशी यांनी दाखल केला असून १ मे रोजी या प्रकरणाची सुनावणी होईल. त्यापूर्वीच गौतम गंभीरने स्पष्टीकरण देऊन टाकले आहे.

काय आहे प्रकरण -

गौतम गंभीर याने काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्याला भाजपने पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. शपथपत्रामध्ये आपण राजेंद्र नगर मतदार संघात मोडतो, असे गंभीरने नमूद केले आहे. मात्र, त्याच्या या उमेदवारीवर गदा येण्याची शक्यता आहे. कारण गौतम गंभीर याचे नाव दिल्लीच्या राजेंद्र नगर आणि करोल बाग या २ विधान सभा क्षेत्राच्या मतदार यादीमध्ये नमूद आहे, असा ठपका 'आप'ने ठेवला आहे.

एकापेक्षा जास्त मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव असणे हे लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन आहे. या प्रकरणावर तीसहजारी न्यायलय १ मे रोजी सुनावणी करणार आहे. त्यात गंभीर जर दोषी आढळला तर कायद्यान्वये त्याला ही निवडणूक लढण्यापासून वंचित रहावे लागेल.

आम आदमी पक्षाने हरण्याच्या भीतीमुळे ही तक्रार दाखल केली, असे दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांचे म्हणणे आहे. गौतम गंभीरचे सर्व कागदपत्रे बरोबर आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.

Intro:Body:

National NEWS 02

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.