ETV Bharat / bharat

गांधीजींचे संवादकौशल्य आणि संज्ञापनातील गांधीवाद... - संज्ञापनातील गांधीवाद

गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त, त्यांच्या आयुष्यातील रंजक प्रसंग, विचार आणि गांधीवाद याबाबतचे लेख आपण आतापर्यंत वाचले. या लेखामध्ये गांधीजींचे संवादकौशल्य आणि संज्ञापनातील गांधीवादाबद्दल आपण वाचणार आहोत. बापुंच्या जडणघडणीतील कहाण्या तसेच स्वातंत्र्य संग्रामातील घटना यांच्यामार्फत त्यांची जीवनगाथा मांडण्याचा हा प्रयत्न...

Gandhian Communication
author img

By

Published : Sep 2, 2019, 5:23 AM IST

Updated : Sep 2, 2019, 9:51 AM IST

अमरावती - द्वेष आणि हिंसाचाराची भाषा लोकांना विभाजित करते, लोकांमध्ये भीती निर्माण करते आणि त्याचे अनागोंदी गुण नंतर संपूर्ण समाज व्यापून टाकतात. कट्टरपंथीय विचारांच्या लोकांनी केलेल्या हिंसक भाषणांची लोकांना भुरळ पडत असली, तरी लोक हळूहळू गांधीवादी वक्ततृत्वाचे महत्त्व मान्य करत, त्याकडेच परत गेले. सुरुवातीला संघर्ष कदाचित जिंकू शकेल, परंतु शेवटी शांतताच विजयी होते. म्हणूनच, गांधीवादी संज्ञापन आवश्यक आहे आणि मानवतापूर्ण आणि नीतिमान समाज प्रस्थापित करण्यासाठी ते गरजेचे आहे.

जनतेचा महात्मा असलेल्या गांधींनी, केवळ भारताच्या स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणाच दिली नाही, तर संवादाच्या सीमाही नव्याने परिभाषित केल्या. हे सांगितले किंवा नाही सांगितले तरी विशेष फरक पडणार नाही, मात्र गांधीजींना संवाद साधण्यासाठी नेहमीच शब्दांची आवश्यकता होती असे नाही. विविधतेत एकता साधण्याचे साधन म्हणून त्यांनी मन वळवणार्‍या संवादाचे समर्थन केले आहे. त्यांच्या एका वाक्यामधून हे स्पष्ट होते - “मला एकेकाळी असे वाटते की, नेतृत्वासाठी बलवान होणे आवश्यक आहे; पण आज नेतृत्व करणे म्हणजेच लोकांची साथ मिळवणे होय”.

हेही वाचा : गांधीजींची स्वातंत्र्याची संकल्पना...

गांधीजी अस्सल वक्ता आणि एक प्रामाणिक लेखक होते. त्यांचा उल्लेखनीय साधेपणा, प्रामाणिकपणा आणि निर्मळपणा यांनी शब्दशः त्यांच्या विचारांची उंची वाढवली. गांधीजी एखाद्या गोष्टीच्या बाबतीत नेहमीच पहिले पाऊल उचलत. त्यांच्या पत्रकारितेच्या लेखनातून असो किंवा त्यांच्या नैतिकतेने प्रेरित अशा भाषणांद्वारे असो; त्यांनी आपल्या शब्दांनी लोकांना स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
आपल्या लोकांना अहिंसेच्या मार्गाने मार्गदर्शन करताना गांधीजींनी हे सिद्ध केले, की त्यांची अहिंसावादी कलम ही लोकांवर वार करणाऱ्या ब्रिटिशांच्या हिंसक तलवारीपेक्षाही भीषण होती. ते एक लाजाळू वक्ता होते. परंतु, त्यांचा असा विश्वास होता की ती त्यांची जमेची बाजू होती. ते म्हणत, “माझ्या बोलण्यातला संकोच,ही एकेकाळी चीड होती, आता आनंद देणारी आहे. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याने मला शब्दांची अर्थव्यवस्था शिकविली. ” त्यांना दबलेल्यांना आवाज मिळवून द्यायचा होता. सत्याग्रहमधील लेखांच्या माध्यमातून त्यांना जेवढ्या प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचता आले नाही, तेवढ्या प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना त्यांच्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणाचा फायदा झाला. गांधीजी हे त्यांच्या विवेकांचे, सर्वगुणांचे आणि अनुयायींचे देखील ऐकत. गांधी हे विनवणी करणारे, विनोद करणारे व्यक्ती होते. त्यांच्या असण्याने त्यांच्या अनुयायांमध्ये शांततेची भावना निर्माण होत.

सूत कातणे असो, खादी परिधान करणे असो किंवा मग मिठाचा सत्याग्रह, गांधीजींनी शब्दांशिवाय आपल्या कृतीमधून दृष्टीकोन मांडले; जगाला थक्क करून सोडले. उपदेश करण्याआधी स्वतः कृती करावी असे म्हटले जाते. मात्र गांधीजींनी कोणाला उपदेश करण्याची गरजच पडली नाही. त्यांचे अनुयायी त्यांच्याकडे पाहून, त्यांचे अनुकरण करत. स्वातंत्र्यलढ्याच्या नेतृत्वस्थानी जाण्यासाठी त्यांना मोठमोठ्या भाषणांची, अलंकारिक शब्दांची आवश्यकता नव्हती. त्यांची भेदक शांतता, उपोषणे आणि नेतृत्वकला यांमुळेच त्यांच्याकडे स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व आले. ते आधी सत्यशोधक होते, नंतर स्वतःच सत्य झाले.

हेही वाचा : महात्मा गांधी : एक व्यावहारिक आदर्शवादी

गांधीजींना कायम खादीमध्ये पाहून कोणाला असेही वाटेल, की गांधीजी एका नेत्याच्या भूमीकेला साजेशी वेशभूषा नव्हते करत. मात्र, महात्मा गांधींच्या चरित्रात डोकावून पाहिल्यास त्यामागचे कारण लगेच लक्षात येईल. त्यांच्याकडे पाहिल्यावरच त्यांचा साधेपणा दिसून येतो. गांधीजी हे कधीच फक्त खादीवर नव्हते, तर सत्य आणि अहिंसा ही दोन आभूषणे त्यांनी कायम परिधान केली होती. गांधीजी दर्शनी भागावर लक्ष देण्यापेक्षा विचारांच्या दृढतेवर लक्ष देण्याला प्राधान्य देत. आपल्या विचारांच्या आणि शब्दांच्या जोरावरच त्यांनी असा लढा उभारला ज्यामध्ये रक्तपाताला स्थान नव्हते. जिथे त्यांचे शब्द कमी पडले, तिथे त्यांच्या कृतीमधून त्यांनी लोकांना प्रेरणा दिली. त्यामुळेच हजारो लोकांनी त्यांना आपला नेता म्हणून मान्य केले. त्यांच्या बोळक्या मात्र विश्वासू हास्याने लोकांना आशेचा किरण दाखवला. हिंसेच्या आगीला जेव्हा गांधीजींनी अहिंसेच्या जोरावर थांबवून दाखवले, तेव्हा लोकांना अहिंसेची खरी ताकद लक्षात आली. ओरडून सांगितलेल्या हजार वाक्यांपेक्षा शांततेत सांगितलेल्या काही शब्दांना जास्त मूल्य असते.

गांधींनी सत्याग्रह या नियतकालीकाद्वारे नेहमीच सत्यासाठी लढा दिला. मौखिक संज्ञापनाबद्दल गांधीजींच्याच शब्दांमध्ये त्यांचे विचार मांडून मी थांबू इच्छितो - "आपले विचार सकारात्मक ठेवा, कारण आपले विचार आपले शब्द बनतात. आपले शब्द सकारात्मक ठेवा, कारण आपले शब्द आपले वर्तन बनतात. आपली वागणूक सकारात्मक ठेवा, कारण आपली वागणूक आपली सवय बनते. आपल्या सवयी सकारात्मक ठेवा, कारण आपल्या सवयी आपली मूल्ये बनतात. आपली मूल्ये सकारात्मक ठेवा, कारण आपली मूल्ये आपले नशीब बनतात."

हेही वाचा : दलितांसाठी गांधीजींनी मिळविलेला विजय

संबंधित लेख डॉ. चल्ला कृष्णवीर अभिषेक यांनी लिहिला आहे. आंध्र विद्यापीठात ते सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हणून काम करतात.

Intro:Body:

Nat

Conclusion:
Last Updated : Sep 2, 2019, 9:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.