ETV Bharat / bharat

'पैसे नही दुआ देना', हैदराबादच्या मोहम्मद हनिफ यांचे कौतुकास्पद कार्य - Hyderabad auto driver news

हैदराबादच्या झहरा नगर येथे राहणारे 84 वर्षीय मोहम्मद हनीफ हे रिक्षाचालक मागील 3 वर्षांपासून रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्याचे काम करतात. हे काम ते मोफत करत असून बदल्यात फक्त आशीर्वाद द्या, असे म्हणतात.

मोहम्मद हनिफ
मोहम्मद हनिफ
author img

By

Published : Oct 7, 2020, 10:00 PM IST

Updated : Oct 7, 2020, 10:42 PM IST

हैदराबाद - या जगात पैसे आज आहेत तर उद्या नाही. पण एखाद्याने दिलेले आशीर्वाद मात्र, आपल्या सोबतच असतात, असा संदेश देत हैदराबाद येथील 84 वर्षीय मोहम्मद हनीफ हे रुग्णांना मोफत रुग्णालयात नेण्याचे काम करत आहेत. मागील तीन वर्षांपासून ते दररोज किमान दहा रुग्णांना रुग्णालयात पोहोचवितात त्या बदल्यात पैसे नको दुआ द्या, असे म्हणतात.

हैदरबादच्या मोहम्मद हनिफ यांचे कौतुकास्पद कार्य

हैदराबादच्या झहरा नगर येथे राहणाऱ्या मोहम्मद हनीफ यांनी 2006साली हज यात्रा केली आहे. पण, त्या हजचे यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ही यात्रा सायकलने केली होती. त्यासाठी त्यांना नऊ महिन्याचा कालावधी लागला होता. अनेक देश ओलांडून ते सौदी अरेबियाच्या मक्का, मदिना या शहरात पोहोचले होते. येणाऱ्या एक-दोन वर्षात त्यांना पॅलेस्टाईनच्या जेरूसलेमच्या जायचे आहे, तेही सायकलवर. त्यासाठी त्यांना प्रार्थना व आशीर्वादची गरज आहे, असे ते म्हणतात.

मोहम्मद हनीफ यांना आठ मुले आहेत. आठही मुले उच्च शिक्षित आहेत. मात्र, ते आपल्या मुलांवर विसंबून न राहता स्वतः रिक्षा चालवून स्वतःच्या गरजा पूर्ण करतात.

दरवर्षी घेतात सायकल स्पर्धेत भाग

हैदराबादमधील गच्चीबावली येथे दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी शंभर किलोमिटरची सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत मोहम्मद हनीफ हे दरवर्षी भाग घेतात. आत्तापर्यंत त्यांनी 19 वेळा ही स्पर्धा जिंकून पदक मिळवले आहे. सायकल चालवल्यामुळे आरोग्य उत्तम राहतो. त्यामुळे सायकल चालवत राहावी, असे ते म्हणतात.

हेही वाचा - देशातील 'इतकी' विद्यापीठे सापडली बनावट; उत्तर प्रदेश, दिल्लीत मोठी संख्या

Last Updated : Oct 7, 2020, 10:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.