ETV Bharat / bharat

मध्य प्रदेशात आधार कार्ड, सिमकार्डचा वापर करून फसवणूक करणारी टोळी जेरबंद

केवायसी अभियानाचा भाग असल्याचे सांगून नागरिकांकडून आधार क्रमांक व इतर तपशील घेत सात हजार सिमकार्ड कार्यान्वित केल्याची घटना मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे घडली आहे.

fraud-involving-aadhaar-numbers-sim-cards-busted-3-held-in-jabalpur
आधार कार्ड, सिमकार्डचा वापर करुन फसवणूक करणारी टोळी जेरबंद
author img

By

Published : Nov 8, 2020, 5:07 PM IST

जबलपूर (मध्य प्रदेश) - जबलपूरमधील बर्गी येथील सात हजार सिमकार्ड कार्यान्वित करण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या आधार कार्डचा वापर केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. एडविन जेकब (30), निलेश सेन (२२) आणि कृष्णकुमार मेहरा ( 22) रा. सर्व जबलपूर असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या सिमकार्डचा वापर सायबर गुन्हे करण्यासाठी होत होता, अशी माहिती जबलपूर पोलिसांनी रविवारी दिली.

हे तिघे सरकारच्या कल्याणकारी योजनांसाठी केवायसी अभियानाचा भाग असल्याचे सांगून नागरिकांकडून आधार क्रमांक व इतर तपशील घेत असत, अशा प्रकारे त्यांनी सात हजार सिमकार्ड खरेदी केली होती. हे सिमकार्ड ते पश्चिम बंगाल आणि इतर राज्यातील सायबर गुन्हेगारांना विकत असत, अशी माहिती सायबर (जबलपूर झोन) चे पोलिस अधीक्षक अंकित शुक्ला यांनी दिली. एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या नावावर असलेले सिमकार्ड दुसऱ्या व्यक्तीने वापरले आहे, अशी तक्रार जबलपूर पोलिसांत केली होती. त्यानंतर सुरू झालेल्या चौकशीत हा सर्व प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा- सुरक्षिततेची खबरदारी घेऊन दिवाळी नंतर शाळा सुरू कराव्यात - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.