तामिळनाडू - येथील डिंडीगुळ जिल्ह्यातील कोडाईकनाल रोड रेल्वे स्थानकाजवळ चार जणांनी धावत्या रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केली. आज (शुक्रवारी) पहाटेच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली आहे. हे कुटुंब तिरुची जिल्ह्यातील वराईयूर येथील होते. पहाटे 1 ते 3 च्या सुमारास ही घटना घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा- निर्भयाच्या गुन्हेगारांना तत्काळ फाशी द्या, आई आशा देवींची सर्वोच्च न्यायालय आणि केंद्राकडे मागणी
उथिराभारती (वय 50), संगीता(वय 43), अभिनयश्री (वय 15), आकाश (वय ११) असे मृत व्यक्तींची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, उथिराभारती हे एक उद्योजक होते. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. हे कर्ज ते फेडू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. त्यांचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी आल्यावर याबाबत अधिक माहिती मिळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहे.