ETV Bharat / bharat

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींं यांची अशी होती राजकीय कारकिर्द - प्रणव मुखर्जी मृत्यू

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर दिल्लीतील आर्मी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे काँग्रेस आणि देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

former president pranab mukherjee demise  former president pranab mukherjee died  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मृत्यू  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी  former president pranab mukherjee  former president pranab mukherjee birth  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा जन्म  प्रणव मुखर्जी मृत्यू
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचे निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
author img

By

Published : Aug 31, 2020, 6:13 PM IST

Updated : Aug 31, 2020, 6:46 PM IST

नवी दिल्ली - भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले आहे. त्यांनी ८५ व्या वर्षी दिल्लीच्या आर्मी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच त्यांना कोरोनाची लागण देखील झाली होती. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला आढावा...

पश्चिम बंगालमधील 'या' गावात जन्म -

प्रणव मुखर्जी हे भारताचे 13 वे राष्ट्रपती होते. त्यांच्या राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 असा होता. मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 ला पश्चिम बंगाल राज्यातील बिरभूम जिल्ह्यातील मिराची या गावात झाला. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जन्म झाल्यामुळे प्रणव मुखर्जी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील विविध घटनांचे साक्षीदार राहिले आहेत. प्रणव मुखर्जी यांचा प्रवास सामान्य नागरिक ते भारताचे राष्ट्रपती असा राहिला.

प्रणव मुखर्जींचे शिक्षण -

कोलकाता विद्यापीठातून प्रणव मुखर्जी यांनी राज्यशास्त्र आणि इतिहास विषयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याच विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी मिळवळी. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सरकारी कार्यालयात क्लर्कची नोकरी सुरू केली होती. काही दिवसानंतर त्यांनी दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात राज्यशास्त्र विषयाचे अध्यापन सुरू केले होते.

former president pranab mukherjee demise  former president pranab mukherjee died  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मृत्यू  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी  former president pranab mukherjee  former president pranab mukherjee birth  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा जन्म  प्रणव मुखर्जी मृत्यू
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींं यांची अशी होती राजकीय कारकिर्द

राजकीय कारकिर्दीला सुरुवात

प्रणव मुखर्जी यांनी 1969 मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1969 मध्ये राज्यसभेवर निवडून गेले होते. यानंतर त्यांची राज्यसभेतील उपनेते म्हणून निवड झाली होती. पुढे सलग चार वेळा ते राज्यसभेवर निवडून गेले होते. 1980 मध्ये त्यांची राज्यसभेतील काँग्रेसच्या सभागृह नेतेपदी निवड झाली होती.

2004 मध्ये प्रणव मुखर्जी लोकसभेवर जनगीपूर मतदारसंघातून निवडून गेले होते. 2009 मध्येही त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. युपीए सरकारच्या काळात प्रणव मुखर्जी यांनी 2009 ते 2011 या काळात केंद्रीय अर्थमंत्रिपदी काम केले. मुखर्जी यांनी राजकीय कारकिर्दीत परराष्ट्र मंत्री, वाणिज्यमंत्री, अर्थमंत्री या पदावर काम केले होते.

प्रणव मुखर्जींना मिळालेले पुरस्कार -

प्रणव मुखर्जी यांना 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2019 मध्ये भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. 1997 मध्ये त्यांन सर्वोत्कृष्ट संसदपट्टू म्हणून सन्मानित केले गेले होते.

चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत मुखर्जी यांनी वाणिज्यमंत्री, वित्तमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षण मंत्री आणि भारतीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये प्रणव मुखर्जी पहिल्यांदा अर्थमंत्री झाले. 1984 मध्ये युरोमनी मॅगझिनने मुखर्जी यांचा गौरव केला. परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यरत असताना मुखर्जी यांनी अमेरिकेसोबतच्या संबंधामध्ये सुधारणा आणली. भारत अमेरिका अणूकरार 2010 मध्ये दोन्ही देशांनी स्वाक्षरी केल्या.

राष्ट्रपती भवनाचा इतिहास सांगणारे 13 खंड मुखर्जी यांच्या काळात प्रसिद्ध झाले. 11 हजार स्क्वेअर फुट क्षेत्रात दोन संग्रहालयदेखील त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रपती भवनमध्ये सुरू झाली. यामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगितला जातो.

2019 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी प्रणव सर की पाठशाला हा उपक्रम सुरू केला होता.

२०१५ ला पत्नीचे निधन -

1957 मध्ये प्रणव मुखर्जी यांनी सुव्रा मुखर्जी यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले आणि एक मुली आहेत. प्रणव मुखर्जी यांच्या पत्नीचे निधन 18 ऑगस्ट 2015 रोजी झाले. मुखर्जी यांना वाचन, बागकाम, संगीत यामध्ये रुची होती. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर ते त्यांचा वेळ प्रणव मुखर्जी फाऊंडेशनसाठी देत होते.

Last Updated : Aug 31, 2020, 6:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.