बंगळुरू - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते सिद्धारमय्या यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज सकाळीच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, याबाबत सोशल मीडियावर गृहमंत्री अमित शाह यांना प्रदुर्भाव झाल्यानंतर बातमी समोर आली. कर्नाटक मध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. सध्या ७३ हजार २२७ अॅक्टिव्ह केसेस असून २ हजार ४१२ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...)