अजमेर - कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र, या लॉकडाऊनच्या काळात चप्पल व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
एकट्या अजमेरमध्ये या कामाशी संबंधित जवळपास साडेचार हजार कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. पिढ्यानपिढ्या या कामाशी संबंधित कामगार लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाले आहेत.
अजमेरमध्ये मोठ्या प्रमाणात फुटवेअरचे काम चालते. जिंगर समाजातील लोक पारंपारिक काळापासून मोजडी चप्पल बनवण्याचे काम करत आहेत. अजमेरमध्ये जवळपास 1300 कुटुंबे लेदर, भरतकाम व हस्तकला करणारे आहेत.
हे लोक मागणीनुसार डिझायनर बूट आणि चप्पलही तयार करतात. अजमेर हे एक धार्मिक आणि पर्यटन शहर आहे. पारंपारिक मोजडी आणि चप्पल येथे येणार्या पर्यटकांच्या नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. हा व्यवसाय आधुनिक चप्पलच्या युगात देखील उभा आहे. केवळ स्थानिक लोकच नव्हे, तर पर्यटक देखील मोजडी खरेदी करतात.
लॉकडाऊनमुळे नुकसान -
कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे मोझडी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. या पारंपारिक कामात गुंतलेल्या 1300 कुटुंबांसमोर रोजीरोटीचे संकट उभे राहिले आहे. त्यांच्याकडे घर आणि दुकानाचे भाडे, कौटुंबिक पोषण, मुलांचे शुल्क, बँक कर्जाचा हप्ता भरण्यासाठी पैसे नाहीत. तसेच शासनाकडून देखील मदत मिळाली नसल्याचे येथील कामगारांनी सांगितले आहे. त्यामुळे व्याजाशिवाय कर्ज उपलब्ध करुन देण्याची मागणी, वीज बिल माफ करावे, अशी मागणी या कामगारांनी केली आहे.