सुरेंद्रनगर - गुजरातमध्ये ट्रक आणि गाडीची जोरदार धडक झाल्याने मोठा रस्ता अपघात झाला आहे. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जण गंभीर जखमी असून त्यांला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरेंद्रनगर जिल्ह्यातील लिंबडी शहराजवळ हा अपघात झाला आहे.
चालकाचे कारवरील नियंत्रन सुटले आणि कार सरळ ट्रकला जाऊन धडकल्याने अपघात झाला आहे. लॉकडाऊन असताना ही कार कोठे जात होती याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी २१ दिवसांसाठी देश लॉकडाऊन केला आहे. यादरम्यान केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत.
दरम्यान देशभरात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरवर्षी सुमारे १.५ लाख नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. अपघाता ची वाढती संख्या पाहता मोटर वाहन दुरुस्ती विधेयक 2019 लागू करण्यात आले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दुरुस्ती विधेयकामध्ये कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत.