भोपाळ - मध्यप्रदेशातील झांसी जिल्ह्यात भिंत कोसळून ५ मजूरांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले आहेत. बारुआसागर शहरातील लक्ष्मीपूरा भागात भींत बांधण्याचे काम सुरू असताना अचानक भींत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली मजूर अडकले होते.
जखमींना झांसी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.