नवी दिल्ली - एअर इंडियाच्या पाच वैमानिकांना कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे. मालवाहतूक विमान चीनला घेवून गेले असता कोरोनाची लागण झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या सर्व वैमानिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत.
सध्या एअर इंडियाकडून परेदशात अडकलेल्या नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी 'वंदे भारत मिशन' राबविण्यात येत आहे. दरम्यान, परदेशात जाण्याआधी वैमानिकांची कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. त्यावेळी पाच वैमानिक कोरोनाबाधित आढळून आले. हे सर्व वैमानिक मुंबईतील असल्याची माहिती मिळाली आहे.
युरोप, अमरिका, दक्षिण आशिया, सार्क समुहातील देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना विमानाने माघारी आणण्यात येत आहे. यावेळी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यात येत आहे. या ऑपरेशनचा पहिला टप्पा राबविला जात आहे. त्यात १५ हजार भारतीयांना माघारी आणण्यात येत आहे.