ETV Bharat / bharat

चिंताजनक! कोरोना योद्ध्याचा बळी, पश्चिम बंगामध्ये कोरोनाबाधित डॉक्टरचा मृत्यू

आज पश्चिम बंगालमध्ये एका कोरोनाबाधित डॉक्टरचा मुत्यू झाला आहे. कोरोनाविषाणूमुळे एखाद्या डॉक्टरचा मृत्यू झाल्याची ही कोलकातातील पहिली घटना आहे.

author img

By

Published : Apr 26, 2020, 11:55 AM IST

First case of COVID-19 Positive Doctor's death registered in Kolkata

कोलकाता - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. रुग्णांच्या मृत्यूतही वाढ होत आहे. आज पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे एका कोरोनाबाधित डॉक्टरचा मुत्यू झाला आहे.

या कोरोना योद्ध्यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल होते. कोरोनाविषाणूमुळे एखाद्या डॉक्टरचा मृत्यू झाल्याची ही कोलकातातील पहिली घटना आहे. दरम्यान त्याच रुग्णालयात दाखल झालेल्या आणखी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

पश्चिम बंगालमध्ये 611 कोरोनाबाधित असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 26 हजार 496 वर पोहोचली आहे. यामध्ये 19 हजार 868 अॅक्टीव्ह कोरोनाबाधित असून 824 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे, 5 हजार 803 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.