फिरोजाबाद - भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीसांच्या पुतण्याच्या हत्या प्रकरणी फिरोजाबाद पोलिसांनी शनिवारी आझमगड येथील दोघांना अटक केली. हे दोघे शार्प शुटर असून त्यांना या हत्येची सुपारी तुरुंगात असलेल्या कुख्यात गुंड देवेंद्र यादव याने पाच लाखांची सुपारी दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आशिष यादव आणि संदीप यादव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणाची आग्राचे पोलीस महानिरीक्षक सतीश गणेश यांनी दिलेली माहिती अशी, की - भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीसांचा पुतण्या काचेचा कारखाना चालवत असे. त्याच्या क्लार्क सोबत सन 2014 मध्ये देवेंद्र यादवच्या लहान भाऊ शिवाचे भांडण झाले होते. यावेळी त्याने क्लार्कला ठार मारुन चाळीस हजार रुपये लुटले होते.
या भांडणाचा रागात ही हत्या करण्यात आली आहे. या दोन आरोपींना सिरसागंज येथून अटक करण्यात आले आहे. त्यांच्या कडून दोन गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहे.