ETV Bharat / bharat

दिल्लीत 'प्रिंटीग प्रेस'ला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू; शोधकार्य सुरू

शहरातील पतपरगंज औद्योगिक परिसरात एका छपाईखान्याला आग लागली आहे. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Fire broke out at a paper printing press
प्रिंटीग प्रेसला आग
author img

By

Published : Jan 9, 2020, 7:53 AM IST

Updated : Jan 9, 2020, 8:31 AM IST

नवी दिल्ली - शहरातील पतपरगंज औद्योगिक परिसरात एका छपाईखान्याला आग लागली आहे. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ३५ अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग नियंत्रणात आली असून शोधकार्य सुरू आहे.

दिल्लीत पतपरगंज भागात छपाईखान्याला आग

रात्री २.४० च्या दरम्यान आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. त्यानंतर तत्काळ घटनास्थळी १२ गाड्या पाठवण्यात आल्या. मात्र, त्यानंतर अधिक गाड्या आग विझवण्यासाठी पाठवण्यात आल्या. १५० कर्मचारी आग विझवत आहेत, अशी माहिती अग्मिशामक दलाचे अधिकारी अतुल गर्ग यांनी दिली. मात्र, आता आग आटोक्यात आली आहे.

  • Delhi: Fire broke out at a paper printing press in Patparganj Industrial Area today, one person dead. 35 fire tenders are present at the spot. pic.twitter.com/7syFT5yF7V

    — ANI (@ANI) January 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

छपाईखाना दुमजली इमारतीत असून तळमजल्यापासून दुसऱ्या मजल्यापर्यंत आग पसरली होती. स्कायलिफ्टद्वारे वरील मजल्याला लागलेली आग विझवण्यात आली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शोधकार्य सुरू आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jan 9, 2020, 8:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.