ETV Bharat / bharat

संकटाच्या काळात देशाला आपल्या पत्नीची गरज, 'त्याने' सोडली नोकरी - गाजियाबाद पोलीस

लॉकडाऊनच्या काळात संचारबंदीमुळे पोलीस कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत. गाजियाबादमधील मुरादनगर परिसरात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीने आपल्या पत्नीसाठी नोकरी सोडली आहे. संकटाच्या काळात देशाला आपल्या पत्नीची गरज आहे, हे ओळखून त्यांच्या पतीने हा निर्णय घेतला.

Female Police
महिला पोलीस
author img

By

Published : Apr 16, 2020, 12:25 PM IST

नवी दिल्ली - देशभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार, प्रशासन, आरोग्य विभाग युद्ध पातळीवर काम करत आहेत. या सर्वांना खंबीरपणे साथ देण्याचे काम देशातील पोलीस दल करत आहे. लॉकडाऊनच्या काळात संचारबंदीमुळे पोलीस कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत. गाझियाबादमधील मुरादनगर परिसरात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीने आपल्या पत्नीसाठी नोकरी सोडली आहे.

म्हणून 'त्याने' सोडली नोकरी

सुमन गौतम असे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या मुरादनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे त्यांना १२ ते १५ तास ड्यूटी करावी लागत आहे. या काळात त्यांना त्यांच्या मुलांना वेळ देता येत नाही. कौंटुबिक जबाबदाऱ्याही पूर्ण करता येत नाहीत.

यावर उपाय म्हणून सुमन यांच्या पतीने स्वत:ती नोकरी सोडून दिली. सुमन यांना निश्चिंत राहून काम करता यावे यासाठी त्यांचे पती मुलांची आणि घराची सर्व जबाबदारी सांभाळत आहेत. संकटाच्या काळात देशाला आपल्या पत्नीची गरज आहे, हे ओळखून त्यांच्या पतीने हा निर्णय घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.