चंदीगढ - सणासुदीच्या काळात दुधापासून बनविण्यात येणाऱ्या मिठाई आणि इतर पदार्थांना बाजारात मागणी वाढते. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभाग दूध वाहतूकीवर करडी नजर ठेवून आहे. उत्तर प्रदेशातील साहिबाबाद येथे महाराष्ट्रातून आलेला एक दुधाचा टँकर एफडीएने तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे. दुधाचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेमध्ये पाठवण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील नेचर डिलाईट डेअरीचा दुधाचा टँकर उत्तरप्रदेशातील साहिबाबाद येथील पारस डेअरी येथे जात असताना ही कारवाई करण्यात आली. सण आणि उत्सवाच्या काळात भेसळयुक्त अन्नदार्थ बाजारामध्ये येण्याचे प्रमाण वाढते. दोन तीन दिवसांच्या प्रवास काळात दूध टिकवून ठेवण्यासाठी कोणते केमिकल वापरण्यात येतात, याचा शोध एफडीएचे अधिकारी घेत आहे. यामध्ये जर काही भेसळ आढळून आली तर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. दूध हे नाशवंत पदार्थ असल्यामुळे डेअरीकडून योग्य ती काळजी घेण्यात येते की नाही, याची चौकशी केली जाणार आहे.
हॉटेल आणि दुकानांवरही एफडीएकडून छापेमारी करण्यात येत आहे. दुधामध्ये सिंथेटिक पदार्थ आणि जिटर्जंटचा वापर करण्यात येतो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते.