ETV Bharat / bharat

इंग्लंड-अमेरिकेतील कोरोनाचा हैदराबादच्या आयटी क्षेत्रावर गंभीर परिणाम

देशातील अल्पमुदतीच्या लॉकडाऊनचा परिणाम आयटी क्षेत्रावर होणार नाही, असे हैदराबाद सॉफ्टवेअर एंटरप्रायझेस असोसिएशनचे अध्यक्ष मुरली बोल्लू यांनी म्हटले आहे. मात्र, लॉकडाऊन एकत्रितपणे काही महिने राहिला, तर त्याचा आयटी क्षेत्रावर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर मोठे संकट येऊ शकते, असे त्यांनी सांगितले. सध्याच्या घडीला आयटी क्षेत्रातील किमान ५० टक्के नोकऱ्या कमी होतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. ईनाडूला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले.

Fate of Hyderabad's IT sector linked to economic revival of US, UK
इंग्लंड-अमेरिकेतील कोरोनाचा हैदराबादच्या आयटी क्षेत्रावर गंभीर परिणाम..
author img

By

Published : Apr 11, 2020, 8:40 PM IST

Updated : Apr 11, 2020, 10:04 PM IST

हैदराबाद - साधारणपणे, देशातील अल्पमुदतीच्या लॉकडाऊनचा परिणाम आयटी क्षेत्रावर होणार नाही, असे हैदराबाद सॉफ्टवेअर एंटरप्रायझेस असोसिएशनचे अध्यक्ष मुरली बोल्लू यांनी म्हटले आहे. मात्र, लॉकडाऊन एकत्रितपणे काही महिने राहिला, तर त्याचा आयटी क्षेत्रावर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर मोठे संकट येऊ शकते, असे त्यांनी सांगितले. अमेरिका आणि युरोपियन देश कोविडमधून सावरले आणि पूर्ववत परिस्थिती निर्माण झाली तर, हैदराबादचे आयटी क्षेत्र पुन्हा जोरदारपणे काम करताना दिसू शकेल. काही आयटी कंपन्यांनी अगोदरच त्यांचा आर्थिक बोजा कमी करण्याचे उपाय योजण्यास सुरूवात केली असून याच्या परिणामी, बहुतेक कर्मचाऱ्यांच्या बढत्या लांबणीवर टाकल्या आहेत. सध्याच्या घडीला आयटी क्षेत्रातील किमान ५० टक्के नोकऱ्या कमी होतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. ईनाडूला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले.

प्रश्न : कोरोना परिणामाला सामोरे जाण्यासाठी आयटी कंपन्या कितपत सुसज्ज आहेत?

प्रथमच आयटी क्षेत्रामध्ये, देशभरातील सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे, ९० ते ९५ टक्के कर्मचारी गेल्या दोन आठवड्यांपासून घरून काम करत आहेत. त्यातील फक्त ५ टक्के कर्मचारी कार्यालयात जाऊन काम करतात. कंपन्यांनी घरून काम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुयोग्य व्यवस्था उपलब्ध करून दिल्या आहेत. अनेक कंपन्यांनी खर्च कमी करण्यास सुरूवात केली आहे. कर्मचाऱ्यांच्या बढत्या आणि वेतनात वाढ ही तात्पुरती लांबणीवर टाकली आहे.

प्रश्न : घरून काम करण्याच्या (वर्क फ्रॉम होम) पद्धतीत आपल्याला काही समस्या आढळल्या का?

आम्हाला असे आढळले आहे, की अनेक कर्मचारी घरात बसण्याची नीट व्यवस्था नसल्याने पाठदुखीची तक्रार करत सुट्टीची मागणी करत आहेत. अनेक शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, ऑनलाईन वर्ग घेण्याचा पर्याय स्विकारल्याने, इंटरनेटचा वापर अमर्याद प्रमाणात वाढला आहे. याच्या परिणामी, प्रचंड मागणी वाढल्याने त्यातून तांत्रिक समस्या उद्भवत आहेत. कर्मचारी एकमेकांना सहसा स्काईपच्या किंवा इतर पद्घतींच्या माध्यमातून बोलत आहेत आणि याच पद्धतीने बैठकाही होत आहेत. मात्र, घरातील मुलांचे खेळणे, लोकांचे बोलणे यामुळे अशा बैठकांमध्ये विविध प्रकारचे व्यत्यय निर्माण होत आहेत. कर्मचाऱ्यांचे असे मत आहे की सध्याची परिस्थिती ग्राहक समजून घेऊन जुळवून घेत असले तरीही, असे फार काळ चालेल अशी अपेक्षा करता येणार नाही आणि विशेषतः जेव्हा ग्राहकांचा संयम सुटेल तेव्हा अवघड होईल.

प्रश्न : प्रकल्प विस्तार आणि कंत्राटांवर कोविड-१९ चा परिणाम होईल का?

प्रत्यक्षात, हा काळ आयटी क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आम्ही आता ग्राहकांशी संपर्क साधून आहोत आणि कंत्राटांच्या नूतनीकरणाबाबत निर्णय लटकले आहेत. अमेरिकेत वेगाने परिस्थितीत सुधारणा झाली तर प्रकल्प कोणत्याही विशेष नुकसानाशिवाय सुरू रहातील. तरीसुद्धा, हे लवकर जर घडले नाही तर, कंत्राटांचे रद्दीकरण आणि पुनर्विचार होऊ शकतो आणि याचा परिणाम आयटी क्षेत्रावर होऊ शकतो. कोविड-१९ चा मृत झालेल्या कंत्राटांच्या पुनरूज्जीवनावरही असा विपरित परिणाम होऊ शकतो.

प्रश्न : आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची कपात केली जाण्याचा प्रचाराबाबत काय?

आमचे आयटी प्रकल्प हे बहुतेक अमेरिका आणि ब्रिटनमधील आहेत. विषाणुच्या प्रसाराचा वेग मंदावला आणि या देशांमध्ये स्थिती झपाट्याने पूर्ववत झाली तर व्यवसायही पूर्ववत होईल. मात्र, आता भविष्यात काय परिस्थिती असेल, याबाबत काहीच ठरवता येणार नाही. आयटी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी नोकरकपातीबाबत आणखी तपशीलांसह संपर्क साधला आहे. त्यांचे मत असे आहे की सध्यातरी, परिस्थिती स्थिर आहे. परंतु, कर्मचाऱ्यांनी आपले कौशल्य वाढवले नाही तर, मात्र त्यांना परिस्थितीच्या रोषाचा सामना कराव लागेल, असे त्यांनी सांगितले आहे. लहान कंपन्यांनी विविध मार्गांनी आपले खर्च कमी करण्याचे उपाय योजण्यास अगोदरच सुरूवात केली आहे. लहान कंपन्यांमध्ये वेतनात कपात अमलात आणली जात आहे. १० टक्क्यांपर्यंत नोकरकपात होण्याची शक्यता आहे. मोठ्या कंपन्यांमध्ये काम करत असतील आणि तांत्रिक प्रगतीच्या दृष्टिने संपूर्णपणे सुसज्ज असतील, त्यांना नोकऱ्या गमावण्याची भीती नाही. जे तज्ञ अधिक चांगल्या भवितव्यासाठी सध्याच्या नोकऱ्या सोडण्यास तयार झाले आहेत, त्यांनी सर्वाधिक वाईट परिणामांचा विचार करून आणि देशातील निकट येऊन भिडणाऱ्या आर्थिक मंदीमुळे, राजीनामे परत घेण्याच्या निर्णयाप्रत आले आहेत.

-मुरली बोल्लू (अध्यक्ष, हैदराबाद सॉफ्टवेअर एंटरप्रायझेस असोसिएशन)

हेही वाचा : लॉकडाऊन अन् मधुमेह : रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करताना..

Last Updated : Apr 11, 2020, 10:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.