नवी दिल्ली - 1 जानेवारी 2021 पासून देशातील सर्व टोल नाक्यांवर FASTag आवश्यक करण्यात आले आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि टोलl प्लाजावर लागणाऱ्या लांब रांगांपासून सुटका करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) फास्टटॅगच्या नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. टोल नाक्यावर डिजीटल पद्धतीने पेमेंट होण्याच्या प्रमाणात वाढ व्हावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी कमी होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे फास्टॅग-
फास्टॅग ही टोलचे पैसे प्रीपेड भरण्याची सुविधा आहे. यामुळे वाहनचालकाला टोलनाक्यावर वाहन न थांबविता पुढे जाणे शक्य होते. यामध्ये रेडिओ फिक्वेन्सीची ओळख असलेली चीप वाहनाला बसविण्यात येते.
सध्या फास्टॅग नसतानाही त्यासाठी असलेल्या रांगेमधून वाहने जात असतात. त्यामुळे टोल नाक्यावर वाहनांची अनेकदा गर्दी होत असते. अद्याप, फास्टॅगचा वापर वाढलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर फास्टॅगचा वापर होण्यासाठी प्रोत्साहन देणारा निर्णय सरकारने घेतला आहे.