ETV Bharat / bharat

दिल्ली चलो आंदोलनाचा १९वा दिवस; सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू

Farmers protest against centers farm acts in Delhi 19th day LIVE Updates
दिल्ली चलो आंदोलनाचा १९वा दिवस; आज शेतकऱ्यांचे उपोषण, पाहा LIVE अपडेट्स..
author img

By

Published : Dec 14, 2020, 6:54 AM IST

Updated : Dec 14, 2020, 7:20 PM IST

19:18 December 14

सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू

19:18 December 14

देशातील शेतकरी केंद्राच्या कृषी कायद्याचे महत्त्व समजतात. अनेक शेतकरी संघटनांनी कृषी कायद्यांना समर्थन दिले आहे.  पंजाबमधील शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय आहे. कोणत्याही किमतीवर कायदे रद्द केले जाणार नाही, असे पियूष गोयल म्हणाले.

12:34 December 14

शेतकऱ्यांनी चर्चा करुन हा मुद्दा सोडवावा..

शेतकऱ्यांनी आंदोलन न करता केंद्र सरकारशी चर्चा करुन हा मुद्दा सोडवावा. जर कृषी कायद्यांमध्ये त्यांना काही बदल हवे असतील, तर ते करणे शक्य आहे. मात्र, कायदे पूर्णपणे मागे घेणे शक्य नसल्याचे मत कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी व्यक्त केले आहे.

12:33 December 14

तोमर अमित शाहांच्या निवासस्थानी दाखल..

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. गेल्या अर्ध्या तासापासून त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे.

11:59 December 14

तोमर यांची भेट घेणार हरियाणाचे शेतकरी..

हरियाणाचे शेतकरी आज केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेणार आहेत. यामध्ये वायकेएसएसचे अध्यक्ष नरेश यादव हे तोमर यांच्याशी चर्चा करतील.

11:57 December 14

दुष्यंत चौटाला घेणार गडकरींची भेट

हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. या दोघांमध्ये शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

10:57 December 14

एमएसपीवर सर्व धान्ये विकत घेऊ शकत नसल्याची अमित शाहांची कबूली - गुरनाम चढुनी

'एमएसपी'च्या नावाखाली सरकार आमच्याकडून त्याच दराने धान्य विकत घेऊ इच्छित आहे. मात्र, तेवढ्या किंमतीत धान्य विकून आम्ही जगू शकत नाही. अमित शाहांनी यापूर्वीच आम्ही दिलेल्या सर्व २३ धान्यांना आमच्या एमएसपीमध्ये सरकार विकत घेऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे, अशी माहिती भारतीय किसान संघटनेचे हरियाणा प्रदेशाध्यक्ष गुरनाम सिंग चढुनी यांनी दिली.

10:39 December 14

राजस्थान-हरियाणा सीमेवरील आंदोलनाचा दुसरा दिवस..

दिल्लीला जाण्यासाठी राजस्थानहून शेकडो आंदोलक रवाना झाले आहेत. मात्र, राजस्थान-हरियाणा सीमेवरच त्यांना थांबवण्यात आल्यामुळे त्यांनी तेथेच आंदोलन सुरू केले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

09:54 December 14

'जामिया'च्या विद्यार्थ्यांना आंदोलकांनी परत पाठवले..

शेतकरी आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-उत्तरप्रदेश सीमेवर जामिया मिलिया विद्यापीठातील काही विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. ते याठिकाणी डफली वाजवत आंदोलन करण्याची परवानगी मागत होते. मात्र, शेतकरी आंदोलकांनी त्यांना परत पाठवले आहे.

08:51 December 14

४० शेतकरी संघटनांचे अध्यक्ष उपोषणाला बसले..

सरकारला जागं करण्यासाठी आज शेतकरी संघटनांचे ४० नेते आझ ठिकठिकाणी उपोषणाला बसणार आहेत. सकाळी आठ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे उपोषण असणार आहे. यांपैकी २५ नेते सिंघू सीमेवर, टिकरी सीमेवर १०, आणि पाच उत्तर प्रदेश सीमेवर उपोषणावर बसणार आहेत.

08:20 December 14

आम्हाला उपाशी राहण्याची सवय; उपोषणासाठी तयार..

दिल्ली-गाजियाबाद महामार्गावर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज १७वा दिवस आहे. याठिकाणी आलेल्या एका शेतकऱ्याने सांगितले, की आम्ही कारखान्यावर ऊस घेऊन जातो तेव्हा कित्येक वेळा २४ तासांसाठी उपाशी रहावं लागतं. त्यामुळे, आम्ही या उपोषणासाठी तयार आहोत.

06:49 December 14

दिल्ली चलो आंदोलनाचा १९वा दिवस; सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू

नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज १९वा दिवस आहे. या आंदोलनादरम्यान आज हे शेतकरी एका दिवसाचे उपोषण करणार आहेत. तसेच, आज देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आंदोलन करण्याचे आवाहनही शेतकऱ्यांनी केले आहे.

आंदोलन तीव्र, देशभरातून वाढतोय पाठिंबा..

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. बुधवारी केंद्र सरकारने दिलेला प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला होता. त्यानंतर रविवारी जयपूर-दिल्ली आणि दिल्ली-आग्रा एक्स्प्रेस-वे बंद करण्यात आला होता. शेतकरी दिवसेंदिवस आपले आंदोलन तीव्र करत आहेत. तसेच, पंजाब-हरियाणामधील आणखी शेकडो शेतकरी, आणि इतर राज्यांमधील शेतकरीही दिल्लीच्या दिशेने अजूनही जात आहेत. सध्या हरियाणा-राजस्थान सीमेवरही मोठ्या प्रमाणात आंदोलकांना अडवून ठेवण्यात आले आहे.

केजरीवालही करणार उपोषण..

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपचे कित्येक नेतेही सोमवारी उपोषण करणार आहेत. त्यांनी यापूर्वीच केंद्र सरकारने आपला हट्ट सोडून, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन केले आहे.

Last Updated : Dec 14, 2020, 7:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.