ETV Bharat / bharat

लग्नावरून परतणाऱ्या कुटुंबाचा अपघात, तीन लहानग्यांसह सहा लोकांचा मृत्यू.. - पीलभीत अपघात

पीलीभीत जिल्ह्यातील गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका अपघातात, एकाच कुटुंबातील सहा लोकांचा मृत्यू झाला, तर चार लोक गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे.

UP Accident, UP pilibhit Accident
लग्नावरून परतणाऱ्या कुटुंबाचा अपघात, तीन लहानग्यांसह सहा लोकांचा मृत्यू..
author img

By

Published : Nov 29, 2019, 10:36 AM IST

लखनौ - लग्नसमारंभावरून परतणाऱ्या गाडीला अपघात झाल्याने, एकाच कुटुंबातील सहा लोकांचा मृत्यू झाला, तर चार लोक गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशच्या पीलीभीत जिल्ह्यातील गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल (गुरुवार) रात्री उशीरा हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंबीय लग्नसमारंभ आटोपून आपल्या घरी चालले होते. रात्री उशीरा खराब हवामानामुळे जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे समोरचे काही दिसत नसल्यामुळे, त्यांची गाडी भरधाव वेगात झाडाला धडकली. या अपघातात कुटुंबातील पाच लोकांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना तेथून बरेलीला हलवण्यात आले. यानंतर, जखमींपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या गाडीतील लोक पूरनपूर कोतवालीमधील जोशी कॉलनीचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा : तेलंगणा : पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेचा भीषण खून; जळालेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

Intro:Body:

लग्नावरून परतणाऱ्या कुटुंबाचा अपघात, तीन लहानग्यांसह पाच लोकांचा मृत्यू..

लखनऊ - पीलीभीत जिल्ह्यातील गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका अपघातात, एकाच कुटुंबातील पाच लोकांचा मृत्यू झाला आहे, तर पाच लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंबीय लग्नसमारंभ आटोपून आपल्या घरी चालले होते. रात्री उशीरा खराब हवामानामुळे जोरदार पाऊस सुरु होता. त्यामुळे समोरचे काही दिसत नसल्यामुळे, त्यांची गाडी भरधाव वेगात झाडाला धडकली. या अपघातात कुटुंबातील पाच लोक जागीच ठार झाले, तर पाच जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर तिथून त्यांना बरेलीला हलवण्यात आले.

या गाडीतील लोक पूरनपुर कोतवालीमधील जोशी कॉलनीचे रहिवासी असल्याची देखील माहिती मिळत आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.