राजीनामासत्र : राहुल गांधींच्या पाठोपाठ ज्योतिरादित्य सिंधिया यांचाही राजीनामा
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरवरून त्यांनी राजीनाम्याची माहिती दिली. तत्पूर्वी मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. वाचा सविस्तर...
मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा दिला राजीनामा
मुंबई - काँग्रेस नेते आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ३ सदस्यीय कमिटी बनवण्याचाही प्रस्ताव दिला आहे. वाचा सविस्तर...
मुंबईत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मोदी हाय हायच्या घोषणा; कर्नाटक घटनेचा केला निषेध
मुंबई - कर्नाटकमधील जेडीयू आणि काँग्रेसच्या ११ आमदारांनी शनिवारी राजीनामा दिला. या आमदारांना मुंबई येथील सोफिटेल हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या आमदारांना ब्लॅकमेल करुन येथे आणले आहे, असा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला. त्यामुळे आज या हॉटेलच्या बाहेर युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी हाय हायच्या घोषणा देत या घटनेचा निषेध केला. निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाचा सविस्तर...
प्रकाश आंबेडकरांनी महाआघाडीचे नेतृत्व करावे - लक्ष्मण माने
रायगड - भाजप- शिवसेना सत्तेला राज्याच्या सत्तेतून बाजूला सारण्यासाठी सर्व पुरोगामी पक्ष व संघटनांच्या महाआघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न मी करत आहे. या सर्व पुरोगामी संघटनांचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी करावे, अशी माझी विनंती आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आता हवेत न राहता जमिनीवर यावे, त्यांनी आमच्यासोबत यावे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी केले आहे. वाचा सविस्तर...
नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर, छोट्या नद्यांनीही गाठली धोक्याची पातळी
नाशिक - अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर रविवारी पावसाने नाशिकमध्ये जोरदार हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, गंगापूर धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच गोदावरी नदीलाही पूर आला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात ९०० मिलिमीटर सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून नाशिक शहरात ३०० मिलिमीटर पाऊस पडला आहे. वाचा सविस्तर...