ETV Bharat / bharat

'भाजपाने मला अटक केली तरी तृणमूल काँग्रेस तुरुंगातही निवडणूक जिंकेन' - ममता बॅनर्जी लेटेस्ट न्यूज

भाजपाने मला अटक केली तरीसुध्दा मला खात्री आहे की, तुरुंगातूनही तृणमूल काँग्रेस मोठ्या संख्येने विजयी होईल, असेही बॅनर्जी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी
author img

By

Published : Nov 25, 2020, 5:39 PM IST

कोलकाता - 'भाजपाने मला अटक केली तर मी तुरुंगातूनही निवडणूक जिंकेन', अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी विजयबाबत विश्वास व्यक्त केला आहे. आगामी बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. भाजपाने मला अटक केली तरीसुध्दा मला खात्री आहे की, तुरुंगातूनही तृणमूल काँग्रेस मोठ्या संख्येने विजयी होईल, असेही बॅनर्जी म्हणाल्या.

भाजपा खोटे बोलणाऱ्यांचा पक्ष -

भारतीय जनता पक्ष हा खोटे बोलणाऱ्यांच्या पक्ष आहे. भाजपा म्हणजे देशाला लागलेला श्राप आहे, अशा शब्दांत ममता यांनी भाजपावर टीका केली आहे. आगामी वर्षात एप्रिल-मे महिन्यादरम्यान बिहार विधानसभेच्या २९४ जागांसाठी मतदान होणार आहे. मला अटक केली तरीसुद्धा मीच जिंकेन असा इशाराही यावेळी ममता यांनी दिला आहे.

भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष नसून खोटे बोलणाऱ्यांचा समूह आहे. निवडणूक जवळ आली की भाजपा नारदा स्टिंग ऑपरेशन किंवा शारदा घोटाळ्यांसारखे विषय बाहेर काढतात, अशा शब्दांत ममता यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.