ETV Bharat / bharat

दुसऱ्या महायुद्धाची पंच्चाहत्तरी पूर्ण - world war2 75th anniversary

जगभरात शहरे आणि गाव खेड्यांमध्ये लोकांनी रस्त्यांवर येऊन नाचून, गाऊन विजयोत्सव साजरा केला. तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी युद्धबंदीची घोषणा करण्यासाठी देशाला संबोधित केले होते.

Europe marks 75th anniversary of end of WWII
दुसऱ्या महायुद्धाची पंच्चाहत्तरी पूर्ण
author img

By

Published : May 8, 2020, 3:06 PM IST

लंडन - फ्रेंच शहर रीम्समध्ये जर्मन जनरल अल्फ्रेड जोडलने आत्मसमर्पण केल्याची बातमी जगभर पसरली तेव्हा न्यूयॉर्क ते लंडन, पॅरिस आणि मॉस्को पर्यंत उत्सव साजरे झाले. 8 मे 1945 रोजी युरोपमधील दुसरे महायुद्ध संपुष्टात आले.

दुसरे महायुद्ध संपण्याचा आनंद जगभरात शहरे आणि गाव खेड्यांमध्ये लोकांनी रस्त्यांवर येऊन नाचून, गाऊन साजरा केला. तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी युद्धबंदीची घोषणा करण्यासाठी देशाला संबोधित केले होते.

Europe marks 75th anniversary of end of WWII
दुसऱ्या महायुद्धाची पंच्चाहत्तरी पूर्ण

दुसरे महायुद्ध संपण्याचा हा दिवस केन हेय यांना ८ मे हा दिवस फक्त युरोप दिन म्हणूनच आठवत नाही, तर त्यादिवशी त्यांची त्यांच्या भावाशी पुन्हा भेट झाली होती.

हे त्यांचे भाऊ नॉर्मंडीमध्ये युद्धात होते. त्यानंतर त्यांना पकडून पोलंडला नेण्यात आले. त्यानंतर, केनला ब्रिटिश आणि अमेरिकन सैन्याने युरोप दिनाच्या विजयाच्या काही दिवसाआधी वाचवले आणि ते यूकेला परतले होते.

लंडनमध्ये, हजारो लोक हातात ब्रिटीश झेंडा आणि चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊन बकिंगहॅम पॅलेस, मॉल आणि ट्रॅफलगर स्क्वेअर येथे एकत्र जमले.

अनेक वर्षांच्या युद्धकाळातील निर्बंध आणि संघर्षानंतर अन्न आणि कपड्यांचे ओझे, बॉम्बस्फोटे सोडण्यास लोक उत्सुक होते.

लंडनच्या लोकांनी हा आनंदोत्सव रस्त्यावर साजरा केला. किंग जॉर्ज सहावा आणि त्याची पत्नी राणी एलिझाबेथ, राजकुमारी एलिझाबेथ आणि मार्गारेट आणि विन्स्टन चर्चिल यांच्यासमवेत बकिंगहॅम पॅलेसमध्ये बाल्कनीत उभे होते. तिथेही खूप लोक जमले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.