नवी दिल्ली : कर्करोगाने पीडित नवी दिल्लीतील एक महिला ओमवती या आपल्या उपचारासाठी अनेक रुग्णालयांत जात होती. मात्र, तीला सदर ठिकाणी उपचार नाकारण्यात येत होते. ईटीव्ही भारतने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली असून या महिलेला उपचार देण्यात सुरुवात करण्यात आली आहे. 'अॅक्शन कॅन्सर' रुग्णालयामध्ये या महिलेवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
हेही वाचा... व्हिडिओ : 'तुमच्या अंगातील मस्ती पाहून मला भयंकर राग येतोय' कोरोनाबाबत चिमुकलीने नागरिकांना खडसावले
शनिवारी ईटीव्ही भारतने ओमवती या महिलेवर रुग्णालयाने उपचार न केल्याची बातमी दिली होती. ज्याचा परिणाम झाल्याचे पहायला मिळत आहे. ईडब्ल्यूएस या अंतर्गत कर्करोगाने ग्रासलेल्या रूग्ण ओमवती यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. अॅक्शन कॅन्सर या रुग्णालयामध्ये सध्या ओमवतींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
वास्तविक ओमवती यांचा मुलगा आईच्या उपचारासाठी अनेक रुग्णालयात गेला होता. त्याच्याकडे आईचा उपचार करण्यासाठी पैसे नव्हते. शालीमार बाग येथील मॅक्स रुग्णालयाने त्यांना ईडब्ल्यूएस प्रकारात प्रवेश घेण्यास नकार दिला. वास्तविक या रुग्णालयात ईडब्ल्यूएस प्रकारासाठी नऊ बेड उपलब्ध आहेत. त्याशिवाय आणखी तीन रुग्णालयांनीही उपचार घेण्यास नकार दिला होता.