ETV Bharat / bharat

Top 10 @ 4 PM : दुपारी चारच्या ठळक बातम्या! - ठळक बातम्या

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

ETV Bharat Maharashtra top ten news stories at four PM
Top 10 @ 4 PM : दुपारी चारच्या ठळक बातम्या!
author img

By

Published : May 9, 2020, 4:35 PM IST

  • मुंबई - एकीकडे लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परराज्यातील स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तर राज्यातल्या मजुरांना आणि विद्यार्थ्यांनाही आपल्या गावी पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या सोमवारपासून एसटीच्या मोफत सेवेला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

सविस्तर वाचा - राज्यातील घरवापसी : गावी जाणाऱ्यांसाठी 'लालपरी'ची मोफत सेवा, सरकारने तयार केले पोर्टल

  • पुणे - बावधन परिसरात घरगुती वादातून बापानेच पाच महिन्याच्या चिमुकलीचे नाक आणि तोंड दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नराधम बापाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पहाटे तीनच्या सुमारास घटना घडली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सविस्तर वाचा - जन्मदात्यानेच पाच महिन्याच्या चिमुकलीचा नाक आणि तोंड दाबून केली हत्या

  • सांगली - सिगारेट दिली नाही, या क्षुल्लक कारणातून मारहाण करत दुकान, चारचाकी आणि दुचाकी वाहने पेटवून देण्याचा प्रकार घडला. सांगलीच्या मिरज तालुक्यातील पाटगावमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी ८ जणांवर गुन्हे दाखल करुन दोघांना मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर वाचा - सिगारेट न दिल्याने दुकानासह चार वाहने पेटवली! सांगलीच्या पाटगावमधील प्रकार..

  • मुंबई - लॉकडाऊन दरम्यान पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास मरीन ड्राइव्ह परिसरात नाकाबंदी दरम्यान 2 पोलीस अधिकारी आणि 1 पोलीस कॉन्स्टेबलवर एका माथेफिरुने चॉपरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सविस्तर वाचा - धक्कादायक : मुंबईत माथेफिरुचा 3 पोलिसांवर चॉपरने हल्ला, पाहा व्हिडिओ

  • रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील पिंंपळी येथील कॅनालमध्ये तीन युवक बुडाले. यातील दोघांना वाचविण्यात यश आले आहे. तर, एक जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहात गेला. त्याचा शोध अद्याप सुरू आहे. हे सर्व जण पिंपळी बुद्रुक येथील आहेत. या घटनेविषयी पिंपळी सरपंचांनी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात कळवले आहे.

सविस्तर वाचा - पिंपळीच्या कॅनालमध्ये तिघे बुडाले; दोघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

  • लातूर - सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये अनेक उद्योग-व्यवसायांना सुट देण्यात आली आहे. परंतु, भविष्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली तर लॉकडाऊनचा चौथ्या टप्प्यालाही सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

सविस्तर वाचा - '....तर लॉकडाऊनचा चौथा टप्पाही लागू होईल'

  • भोपाळ - विशाखापट्टनम येथील कारखान्यातील वायू गळती ताजी असतानाच काल (शुक्रवार) मध्यप्रदेशात वायू गळतीची घटना समोर आली आहे. मात्र, रल्वे विभागाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. रेल्वेच्या ३२ टँकरमधून (LPG) एलपीजी गॅस कर्नाटकाहून भोपाळला आणण्यात येत होता.

सविस्तर वाचा - मध्यप्रदेश: रेल्वे टँकरमधून LPG वायू गळती...मोठी दुर्घटना टळली

  • मुंबई - मुंबईतील कोरोनाच्या संसर्गाचे केंद्र बनलेल्या धारावीतून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या तीन-चार दिवसांत रुग्णांची संख्या घटली असून शुक्रवारी येथे 25 रुग्ण आढळले. ही घट अशीच राहिली तर धारावीतील परिस्थिती नियंत्रणात येईल. मात्र, त्याला वेळ लागेल.

सविस्तर वाचा - धारावीत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; मात्र, धोका टळलेला नाही

  • अहमदनगर - महाराष्ट्र भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डावलल्याने पाथर्डीतील पंकजा समर्थक नाराज झाले आहेत. त्यामुळे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य मुकुंद गर्जे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच टरबूजाला जोडे मारत राज्य नेतृत्वावरही जोरदार टीका केली.

सविस्तर वाचा - विधानपरिषदेवर डावलल्याने पंकजा समर्थक संतापले, टरबूजाला जोडे मारुन निषेध

  • नवी दिल्ली - नॅशनल कॅरीयर एअर इंडिया आणि सहाय्यक एअर इंडिया एक्सप्रेसचे विमाने परदेशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी आज शनिवारी विशेष उड्डाणे भरणार आहेत. यावेळी कतार, ओमान, मलेशिया, युएई आणि युकेमध्ये अडकलेल्या नागरिकांची घरवापसी होणार आहे.

सविस्तर वाचा - वंदे भारत मिशन : आज तिसरा दिवस; युके, बांगलादेशसह आखाती देशांमधील भारतीयांना परत आणणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.