- नवी दिल्ली - सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या रखडलेल्या परीक्षा आता जुलैमध्ये होणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याबाबत माहिती जाहीर केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
सविस्तर वाचा - सीबीएसई बोर्डच्या रखडलेल्या परीक्षा जुलैमध्ये होणार..
- नागपूर - महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे नेहमीच गरम असते. मग ते राज्यस्तरीय राजकारण असे अथवा पक्षीय राजकारण, नेहमीच काही ना काही घडामोडी घडत असतात. सध्या राज्यात आता विधान परिषदेच्या काही जागांसाठी निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यातच भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठी चार उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
सविस्तर वाचा - अनेक दिग्गजांना मागे टाकत भाजपच्या 'या' नेत्याने पटकावली विधान परिषदेची उमेदवारी
- नवी दिल्ली - बाबरी प्रकरणाची अंतिम सुनावणी ३१ ऑगस्टच्या आतच पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. बाबरी मशीद पाडण्याप्रकरणी सीबीआयच्या कोर्टात सुनावणी सुरू आहे, त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.
सविस्तर वाचा - ३१ ऑगस्टच्या आत लागणार 'बाबरी'चा निकाल!
- जळगाव - गेली 40-42 वर्ष मी भाजपसाठी काम करत आहे. पक्षवाढीसाठी निरपेक्षपणे काम केले. त्यामुळे साहजिकच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा होती. परंतु, पक्षाने संधी दिली नाही. याची खंत आहे. ज्यांनी भाजपला शिव्या घातल्या. 'मोदी गो बॅक', असा ज्यांचा नारा होता, अशा राष्ट्रवादीतून आलेल्या लोकांना भाजपने उमेदवारी दिली.
सविस्तर वाचा - 'ज्यांनी शिव्या घातल्या त्यांनाच भाजपने संधी दिली, पक्षाविषयी चिंतन करण्याची गरज'
- मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेवर नेमणूक करावी म्हणून राज्य मंत्रिमंडळाकडून आलेल्या शिफारशीवर अद्यापही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. याविषयी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली.
सविस्तर वाचा - मुख्यमंत्र्यांच्या विधान परिषद नियुक्तीसंदर्भात राज्यपालांना उच्च न्यायालयाचे समन्स
- मुंबई - राज्यात 21 मे रोजी विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार असून संख्याबळानुसार काँग्रेस केवळ एका जागेवर विजय मिळवू शकतो. मात्र, या एका जागेसाठी पक्षातले 123 जण इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. परिषदेची निवडणूक एप्रिलच्या महिना अखेरीला गृहीत धरून पक्षाने इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते.
सविस्तर वाचा - विधान परिषदेच्या एका जागेसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी रांग
- मुंबई - राज्यात लॉकडाऊन काळात 22 मार्च ते 7 मेपर्यंत तब्बल 2 लाख 26 हजार 236 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर अत्यावश्यक सेवेसाठी तब्बल 3 लाख 15 हजार 434 जणांना पास देण्यात आले आहेत. राज्य पोलीस खात्यातील 557 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, यात 62 पोलीस अधिकारी आणि 495 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सविस्तर वाचा - राज्यात 2 लाख 26 हजार व्यक्ती क्वारंटाईन तर 557 पोलिसांना कोरोनाची लागण
- रायपूर - लग्न समारंभ पार पडल्यानंतर नवविवाहित जोडपे हनीमूनला जातात. मात्र, हे सर्व कोरोनाच्या आधी शक्य होते. छत्तीसडमधील एका जोडप्याला लग्न झाल्यानंतर हनीमून ऐवजी क्वारंटाईन सेंटरमध्ये जावे लागले. हनीमून तर दुरच त्यांना घरीसुद्धा जाता आले नाही. त्याला कारण म्हणजे कोरोनामुळे देशभर पाळण्यात येत असलेलं सोशल डिस्टन्सिंग.
सविस्तर वाचा - हनिमूनऐवजी जावं लागलं क्वारंटाईन सेंटरमध्ये, कोरियातल्या नवविवाहित जोडप्यासोबत काय घडलं?
- काबूल - अफगाणिस्तान सरकारमधील आरोग्य मंत्री फिरोजुद्दीन फिरोज यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. आज (शुक्रवारी) त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. देशात आत्तापर्यंत ३ हजार ७०० कोरोनाबाधित आढळून आले असून १०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा - अफगाणिस्तानातील आरोग्य मंत्र्याला कोरोनाची लागण; देशभरात ३ हजार ७०० रुग्ण
- मुंबई - टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिच्या स्वैपाक करणाऱ्या कुकला कोरोना बाधा झाल्याच्या संशयावरुन आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. यानंतर तिने स्वतः ला क्वारंटाईन करून घेतले आहे.
सविस्तर वाचा - गेल्या पाच महिन्यात चौथ्यांदा क्वारंटाईन झाली देवोलिना