- मुंबई : मुंबईत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन, अचानक मागे घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा या 10 पैकी 9 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याने पोलीस दलात तर्क वितर्कांना उधाण आले आहे. या बदल्यांबाबतचे आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाने काढले आहेत. बदली पोलिसांनी नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहून तात्काळ कार्यभार स्वीकारावा, असे आदेशात म्हटले आहे.
सविस्तर वाचा : 'त्या' वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याच! कारण अस्पष्ट..
- मुंबई - देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्राच्या मंत्रालयात कोरोनाचा पुन्हा संसर्ग वाढला आहे. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील एक शिपाई आणि टंकलेखक लिपिकाला कोरोनाची लागण झाली आहे. टाळेबंदी 1 खुली झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने मंत्रालय सुरू करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे.
सविस्तर वाचा : मंत्रालयातील दोन कर्मचारी कोरोनाबाधित; सरकारची वाढली डोकेदुखी
- पुणे - उपमुख्यमंत्री यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याने सोमवार 13 जुलैपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
सविस्तर वाचा : LockDown : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा लॉकडाऊन; अजित पवारांची घोषणा
- ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून पळालेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा रुग्ण गेल्या दोन तासाहून अधिक वेळ फुटपाथवर तडफडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अखेर दोन तासानंतर या रुग्णाला पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याने महापालिका आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे आणखी एक बळी गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
सविस्तर वाचा : धक्कादायक; कोविड रुग्णालयातून पळालेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा फुटपाथवर मृत्यू, नागरिकांमध्ये संताप
- जळगाव - खाऊचे आमिष दाखवून एका नराधमाने 10 वर्षाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केला. ही संतापजनक घटना शुक्रवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास शहरातील गोलाणी मार्केटमध्ये तिसऱ्या मजल्यावर घडली. मुलीवर अत्याचार केल्यानंतर नराधम घटनास्थळावरून पळून गेला.
सविस्तर वाचा : जळगावात १० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार ; खाऊचे आमिष दाखवून गैरकृत्य
- मुंबई - कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर प्रभावी असलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा राज्यभरात तुटवडा आहे. अशा स्थितीत इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा विविध संघटनाकडून आरोप होत आहे. असे असले तरी अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त अरुण उन्हाळे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा दावा फेटाळला आहे. मात्र, मुंबई व राज्यात मागणीच्या तुलनेत रेमडेसीवीरचा पुरवठा कमी होत असल्याचे त्यांनी मान्य केले.
सविस्तर वाचा : राज्यात 'रेमडेसीवीर'चा काळाबाजार नव्हे तुटवडा - एफडीए आयुक्तांचा दावा
- हिंगोली - कोरोनाच्या काळात दहावी बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. मात्र, विद्यार्थ्यांना आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. येत्या आठवडाभरात बारावीचा तर 31 जुलैपर्यंत दहावीचा निकाल लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
सविस्तर वाचा : अखेर दहावी-बारावीच्या निकालाची तारीख ठरली...
- ठाणे - उत्तर प्रदेशचा कुख्यात गुंड विकास दुबे याचा आज उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटर केला. अनेक दिवसांपासून स्पेशल टास्क फोर्स आणि उत्तर प्रदेश पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर काल त्याला अटक करण्यात आली; आणि मध्य प्रदेशातील उज्जैमधून माघारी आणत असताना त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. या प्रकरणानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
सविस्तर वाचा : विकास दुबे एन्काऊंटर : हा संपूर्ण प्रकारच बनावट... 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट'चा खुलासा!
- नूर-सुलतान - कझाकिस्तानमध्ये कोविड-१९पेक्षाही घातक न्यूमोनियामुळे जून महिन्यात ६००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देशातील चीनी दूतावासाने दिली आहे. कोरोना विषाणूच्या मृत्यूदराहूनही या न्यूमोनियाचा मृत्यूदर अधिक आहे. देशाच्या आरोग्य विभागामार्फत या विषाणूबाबत संशोधन सुरू आहे, मात्र अद्याप हा विषाणू कोणता आहे हे स्पष्ट झाले नसल्याचेही ते म्हणाले.
सविस्तर वाचा : कझाकिस्तानमध्ये कोरोनापेक्षाही घातक न्यूमोनियाचे ६०० बळी; चीनचा दावा..
- जिनिव्हा - अमेरिकेने लक्ष्यभेदी कारवाईत इराणचे लष्करी अधिकारी जनरल कासिम सुलेमानी यांची केलेली हत्या बेकायदेशीर असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे. या हत्येसाठी अमेरिकेकडे पर्याप्त पुरावे नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. इराणच्या कुड्स फोर्सचे प्रमुख जनरल सुलेमानीला इराकमधील बगदाद विमानतळाजवळ अमेरिकेने ड्रोनद्वारे लक्ष्यभेदी कारवाईत ठार मारले. ही कारवाई यावर्षी 3 जानेवारीला करण्यात आली होती.
सविस्तर वाचा : 'लक्ष्यभेदी कारवाईत इराणच्या जनरल सुलेमानीची हत्या बेकायदेशीर'