ETV Bharat / bharat

Exclusive : 'आंतरराष्ट्रीय योग दिवसा'च्या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांची विशेष मुलाखत..

author img

By

Published : Jun 19, 2020, 8:05 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या योग दिन हा वेगळ्या रुपात साजरा केला जाणार आहे. जगभरात कोरोना महामारीमुळे अनेक लोकांचा बळी गेला आहे. कोरोना विषाणू हा शरीराच्या इम्युनिटीवरच हल्ला करत असल्यामुळे, शरीराला सुदृढ ठेवणे आणि स्वसुरक्षा बाळगणे हाच यापासून वाचण्याचा उपाय आहे. यामध्ये योग आपल्या किती उपयोगी ठरू शकतो, यासंदर्भातच ईटीव्ही भारतने योगगुरू रामदेव बाबा यांच्यासोबत चर्चा केली आहे...

Special conversation with Yoga guru baba ramdev
Exclusive : 'आंतरराष्ट्रीय योग दिवसा'च्या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांची विशेष मुलाखत..

देहराडून : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या योग दिन हा वेगळ्या रुपात साजरा केला जाणार आहे. जगभरात कोरोना महामारीमुळे अनेक लोकांचा बळी गेला आहे. कोरोना विषाणू हा शरीराच्या इम्युनिटीवरच हल्ला करत असल्यामुळे, शरीराला सुदृढ ठेवणे आणि स्वसुरक्षा बाळगणे हाच यापासून वाचण्याचा उपाय आहे. यामध्ये योग आपल्या किती उपयोगी ठरू शकतो, यासंदर्भातच ईटीव्ही भारतने योगगुरू रामदेव बाबा यांच्यासोबत चर्चा केली आहे...

योग आणि बाबा रामदेव..

योग हा जगण्याचा एक मार्ग आहे. योग म्हणजे धन किंवा संपत्ती नाही, असे मत रामदेव बाबांनी योगाबद्दल बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले, की गेल्या ४० वर्षांपासून ते सतत योगाभ्यास करत आहेत, ज्यामुळे आजही ते सुदृढ आहेत. देशातील तरुण वर्गानेही योगाभ्यास करावा, असे ते म्हणाले. तसेच, कोरोनाला हरवण्यासाठी योगच आपल्या मदतीला येऊ शकते असेही रामदेव म्हणाले.

लवकरच येणार कोरोनावरील औषध..

कोरोनाबाबत बोलताना बाबा रामदेव म्हणाले, की पुढील दोन आठवड्यांच्या आत पतंजलीमार्फत कोरोनाचे औषध बाजारात उपलब्ध केले जाईल. ते म्हणाले, की यामध्ये सर्वात आधी आपण इम्युनिटी वाढवण्यावर भर देणार आहोत. आयुर्वेदामध्ये यासाठी भरपूर उपाय आहेत, ज्यांच्या मदतीने पतंजली हे औषध बनवेल.

नव्या रुपात साजरा होणार योग दिवस..

२१ जूनला बाबा रामदेव पहाटे पाच वाजल्यापासूनच योगाभ्यास सुरू करणार आहेत. देशात मात्र हा कार्यक्रम सकाळी सातपासून सुरू होणार आहे. हरिद्वारहून बाबा रामदेव डिजिटल माध्यमातून घरा-घरात पोहोचतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

चीनला धडा शिकवायला हवा..

सोमवारी भारत-चीन सीमेवर जवानांमध्ये झालेल्या हाणामारीबाबत बोलताना बाबा रामदेव म्हणाले, की चीनच्या काळ्या कृत्याबाबत आपण त्यांना धडा शिकवायला हवा. त्यासाठी आपण चीनी वस्तूंची वापर टाळायला हवा. चीनी वस्तूंचा आपण कायमच विरोध करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सीमेवर जेव्हा आपले जवान बुलेट्सचा वापर करून चीनला लढा देत आहेत, तेव्हा देशातील जनतेने चीनच्या वॉलेटवर हल्ला करायला हवा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.