तिरुवनंतपुरम - केरळमधील त्रावणकोर देवासाम बोर्डच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. हा प्रवेश मल्याळम महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे ‘चिंगाम’ पासून देण्यात येणार आहे. हा निर्णय त्रावणकोर देवासाम बोर्डच्या सदस्यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे.
भक्तांना कोविड 19 च्या मार्गदर्शक सूचनेचे पालन करून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. एकाच वेळेस पाच पेक्षा जास्त भक्तांना गाभाऱ्यात प्रवेश देण्यात येणार नाही. दर्शनावेळी भक्तांमध्ये शारीरिक अंतर कटाक्षाने पाळले जाणार आहे. भक्तांना सकाळी 6 पूर्वी आणि सायंकाळी 6.30 आणि 7.30 दरम्यान प्रवेश दिला जाणार नाही. 10 वर्षाच्या आतील आणि 65 वर्षाच्या पुढील व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही.