नवी दिल्ली - राजधानीत कोरिनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजनिवास नावाने प्रसिद्ध असलेल्या उपराज्यपाल निवासात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. उपराज्यपाल सचिवालयात काम करणार्या चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या कर्मचार्यांमध्ये तिघे लिपिक असून एक चतुर्थ श्रेणीतील कर्मचा्र्याचा समावेश आहे.
सिविल लाइंस भागातील राजनिवासच्या एका भागात दिल्लीच्या उपराज्यपालांचे निवासस्थान आहे. तर, दूसर्या भागात उपराज्यपालांचे सचिवालय आहे. तेथून सगळे कामकाज चालते. उपराज्यपाल सचिवालयात २५० कर्मचारी कार्यरत आहेत. खबरदारी म्हणून या सर्वांची कोरोना चाचणी केली जाऊ शकते.