नवी दिल्ली - निवडणूक आयागाने विरोधी पक्षाच्या व्हीव्हीपॅट संबंधीची मागणी फेटाळली आहे. ईव्हीएम मशीनशी व्हीव्हीपॅटचे ५० टक्के स्लीप पडताळून पहाव्यात अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती.
निवडणूक आयोगाकडे विरोधी पक्षांनी ईव्हीएमसोबत ५० टक्के व्हीव्हीपॅट स्लीपची पडताळणी करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती. ही मागणी समाजवादी पक्ष, काँग्रेस, बसपा, तृणमूल काँग्रेस यांच्या २२ नेत्यांनी केली. या मागणीवर विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाने आज बैठक घेतली. या बैठकीस निवडणूक आयुक्त अशोक लवासाही उपस्थित होते. विरोधकांची मागणी मान्य केल्यास मतमोजणीस दोन ते तीन दिवसांचा अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने आयोगाने ही मागणी फेटाळली.