ETV Bharat / bharat

दिल्ली निवडणूक : अनुराग ठाकूर यांच्यावर 72 तासांसाठी प्रचार बंदी,  निवडणूक आयोगाची कारवाई

प्रचार सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली आहे.

दिल्ली निवडणूक
दिल्ली निवडणूक
author img

By

Published : Jan 30, 2020, 5:36 PM IST

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे. प्रचार सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने 72 तासांसाठी अनुराग ठाकूर यांच्यावर प्रचार बंदी घातली आहे. तसेच प्रवेश वर्मा यांच्यावरही 96 तासांची प्रचार बंदी घालण्यात आली आहे.

प्रचार बंदीमुळे अनुराग ठाकूर पुढचे 72 तास कोणतीही प्रचार सभा, रोड शो, मुलाखती देऊ शकणार नाहीत. भाजप उमेदवार मनीष चौधरीच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. प्रवेश वर्मा आणि अनुराग ठाकूर या दोघांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवण्यात आली आहेत.

हेही वाचा - निर्भया प्रकरण : एक फेब्रुवारीला होणाऱ्या फाशीला स्थगिती द्यावी, आरोपींच्या वकीलाची मागणी..

काय घोषणा दिली होती?

दिल्लीतील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी सोमवारी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अनुराग ठाकूर यांनी 'देश के गद्दारोंको...अशी घोषणा दिली होती, त्यांच्या या घोषनेनंतर उपस्थितांनी 'गोली मारो *** को' असे नारे दिले होते. तर प्रवेश वर्मा यांनी 'शाहीन बागेतील आंदोलक घरात घुसून महिलांवर बलात्कार करू शकतात', असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

हेही वाचा - 'जामिया' विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान गोळीबार, विद्यार्थी जखमी..

Intro:Body:

दिल्ली निवडणूक : अनुराग ठाकूर यांच्यावर 72 तासांसाठी प्रचार बंदी,  निवडणूक आयोगाची कारवाई

नवी दिल्ली -  दिल्ली विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. प्रचार सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने 72 तासांसाठी अनुराग ठाकूर यांच्यावर प्रचार बंदी घातली आहे. तसेच प्रवेश वर्मा यांच्यावरही 96  तासांची प्रचार बंदी घालण्यात आली आहे.

प्रचार बंदीमुळे अनुराग ठाकूर पुढचे 72 तास कोणतीही प्रचार सभा, रोड शो, मुलाखती देऊ शकणार नाहीत.  भाजप उमेदवार मनीष चौधरीच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. प्रवेश वर्मा आणि अनुराग ठाकूर या दोघांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीतून यादीतून हटवण्यात आली आहेत.

हेही वाचा -

काय घोषणा दिली होती?

दिल्लीतील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी सोमवारी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अनुराग ठाकूर यांनी 'देश के गद्दारोंको...अशी घोषणा दिली होती, त्यांच्या या घोषनेनंतर उपस्थितांनी 'गोली मारो *** को' असे नारे दिले होते. तर प्रवेश वर्मा यांनी 'शाहीन बागेतील आंदोलक घरात घुसून महिलांवर बलात्कार करू शकतात', असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

हेही वाचा -

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.