नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत गुरुवारी एका डॉक्टरची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर आलेल्या अहवालात या डॉक्टरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
भूलतज्ञ असलेले हे डॉक्टर मौलाना आझाद मेडिकल कॉलेजच्या इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये कार्यरत आहेत.
देशात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या सर्व कोरोना रुग्णांवर डॉक्टर जिवाची पराकष्टा करत उपचार करत आहेत. मात्र, कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना त्यांच्या संपर्कात आल्यामुळे काही नर्स, डॉक्टर्स तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.