ETV Bharat / bharat

'भाजपची सत्ता असलेल्या राज्यात आम्ही आंदोलकांना कुत्र्यासारखं मारलं' - West Bengal BJP President

भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

दिलीप घोष
दिलीप घोष
author img

By

Published : Jan 13, 2020, 7:44 AM IST

नवी दिल्ली - देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहेत. त्यावरून भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी वादग्रस्त विधान केले आहे. भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटक राज्यात आम्ही नागरिकत्व सुधारणा कायदाविरोधी आंदोलकांना कुत्र्यासारखे मारले, असे दिलीप घोष म्हणाले.

  • Dilip Ghosh,West Bengal BJP President: You will come here, eat our food, stay here and damage public properties. Is it your zamindari? We will bash you with lathis, shoot you, and put you in jail. (12.1.2020) https://t.co/LcFZTrpYPj

    — ANI (@ANI) 13 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलकांनी राज्यातील सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान केले आहे. हे लोक पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मतदार आहेत. त्यामुळे दीदी (ममता बॅनर्जी) त्यांच्याविरूद्ध कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाहीत. मात्र, भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटक राज्यात आम्ही नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलकांना कुत्र्यासारखे मारले आहे', असे घोष म्हणाले. तुम्ही येथे येता, राहता, खाता आणि येथील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करता. हीच का तुमची जमीनदारी? असा सवाल घोष यांनी केला. तसेच येथील मालमत्तेचे नुकसान केल्यास आम्ही तुम्हाला मारू आणि तुरुंगात टाकू, असेही ते म्हणाले. नागरिक्तव सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये आंदोलन सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी आंदोलकांनी अनेक भागांमध्ये बस, रेल्वेगाड्यांना आगी लावल्या होत्या. बंगालमधील बेलदंगा रेल्वे स्थानकाला आंदोलकांनी पेटवले होते. त्यामुळे कोरोमंडल एक्स्प्रेसला हावडामधील उलुबेरिया स्थानकाजवळच थांबवण्यात आली होती. तर, दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. यावेळी ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांना राज्यात तोडफोड केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला होता.

Intro:Body:

'भाजपची सत्ता असलेल्या राज्यात आम्ही आंदोलकांना कुत्र्यासारखं मारलं'

नवी दिल्ली -  देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधामध्ये आंदोलन सुरू आहेत. त्यावरून भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी वादग्रस्त विधान केले आहे. भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटक राज्यात आम्ही नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलकाना  कुत्र्यासारखे मारले, असे दिलीप घोष म्हणाले.

'नागरिक्तव सुधारणा कायद्याविरोधी आंदोलकांनी राज्यातील सार्वजनीक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान केले आहे.  ही लोक पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मतदार आहेत.  त्यामुळे  दीदी(ममता बॅनर्जी) त्यांच्याविरूद्ध कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाहीत. मात्र, भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटक राज्यात आम्ही नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलकाना  कुत्र्यासारखे मारले आहे', असे घोष म्हणाले.

तुम्ही येथे येता, राहता, खाता आणि येथील सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान करता. हीच का तुमची जमीनदारी? असा सवाल घोष यांनी केला. तसेच येथील मालमत्तेचे नुकसान केल्यास आम्ही तुम्हाला मारू आणि तुरुंगात टाकू, असेही घोष म्हणाले.

नागरिक्तव सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये आंदोलन सुरू आहेत. काही दिवसांपुर्वी आंदोलकांनी अनेक भागांमध्ये बस, रेल्वेगाड्यांना आगी लावल्या होत्या. बंगालमधील बेलदंगा रेल्वे स्थानकाला आंदोलकांनी पेटवले होते. त्यामुळे कोरोमंडल एक्सप्रेसला हावडामधील उलुबेरिया स्थानकाजवळच थांबवण्यात आल्या होत्या. तर, दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. यावेळी ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांना राज्यात तोडफोड केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.