ETV Bharat / bharat

मेहबुबा मुफ्ती यांच्या नजरकैदैत तीन महिन्यांनी वाढ

मेहबुबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते अली मोहम्मद सागर आणि पीडीपीचे ज्येष्ठ नेते आणि मुफ्ती यांचे काका सरताज मदानी यांची पीएसए कायद्याअंतर्गत अटकेची मुदत तीन महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली. मुफ्ती यांची अटकेची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Detention of Mehbooba Mufti, two J&K leaders extended by three months

author img

By

Published : May 6, 2020, 10:38 AM IST

नवी दिल्ली - सध्या देशभरात करोनाचा कहर असल्याने लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. अशात माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांच्यासह तीन नेत्यांच्या नजरकैदैत वाढ करण्यात आली आहे.

मेहबुबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते अली मोहम्मद सागर आणि पीडीपीचे ज्येष्ठ नेते आणि मुफ्ती यांचे काका सरताज मदानी यांची पीएसए कायद्याअंतर्गत अटकेची मुदत तीन महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली. मुफ्ती यांची अटकेची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांना सुरक्षेच्या कारणास्तव नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी सुरू झालेली त्यांची नजरकैद अद्याप संपलेली नाही. आता फक्त त्यांची रवानगी त्यांच्या श्रीनगर येथील घरी करण्यात आली आहे. ५ ऑगस्टला केंद्रसरकारने घेतलेल्या निर्णयानंतर हजारहून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले होते.

दरम्यान नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांच्या सुटकेची मागणी केली होती. केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून, राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यानंतर तब्बल 8 महिन्यांनी ओमर अब्दुल्ला यांची मागील महिन्यात सूटका करण्यात आली. मात्र, मुफ्ती आणि इतर पक्षांच्या नेत्यांना अजूनही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.