ETV Bharat / bharat

साक्षरतेमध्ये पहिल्या पाचातही नाही महाराष्ट्र, आंध्र सर्वात खाली; केरळची आघाडी कायम

शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आंध्र प्रदेशचा साक्षरता दर हा चक्क बिहारपेक्षाही कमी असल्याचे दिसून आले आहे. देशात पहिल्या पाच साक्षर राज्यांमध्ये अनुक्रमे केरळ, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आसामचा क्रमांक लागतो. साक्षरतेनुसार देशात महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. तर बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेश ही तीन राज्ये सर्वात खाली असल्याची माहिती या अहवालात समजली आहे.

Delhi ranks second in literacy rate Andhra Pradesh lowest literacy rate
साक्षरतेमध्ये केरळ सर्वात पुढे, तर आंध्र सर्वात खाली; पहिल्या पाचातही नाही महाराष्ट्र...
author img

By

Published : Sep 8, 2020, 1:22 PM IST

नवी दिल्ली : जागतिक साक्षरता दिनाच्या निमित्ताने आज देशाची राज्यनिहाय साक्षरता आकडेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये नेहमीप्रमाणे केरळ राज्य आघाडीवर आहे. तर देशातील सर्वात कमी साक्षर राज्य आंध्र प्रदेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आंध्र प्रदेशचा साक्षरता दर हा चक्क बिहारपेक्षाही कमी असल्याचे दिसून आले आहे. देशात पहिल्या पाच साक्षर राज्यांमध्ये अनुक्रमे केरळ, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आसामचा क्रमांक लागतो. साक्षरतेनुसार देशात महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. तर बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेश ही तीन राज्ये सर्वात खाली असल्याची माहिती या अहवालात समजली आहे.

राज्यनिहाय साक्षरता दर -

  • केरळ - 96.2%
  • दिल्ली - 88.7%
  • उत्तराखंड - 87.6%
  • हिमाचल प्रदेश - 86.6%
  • आसाम - 85.9%
  • महाराष्ट्र - 84.8%
  • पंजाब - 83.7%
  • गुजरात - 82.4%
  • तामिळनाडू - 82.9%
  • पश्चिम बंगाल - 80.5%
  • हरियाणा - 80.4%
  • ओडिशा - 77.3%
  • जम्मू-काश्मीर - 77.3%
  • छत्तीसगड - 77.3%
  • कर्नाटक - 77.2%
  • झारखंड - 74.3%
  • मध्य प्रदेश - 73.7%
  • उत्तर प्रदेश - 73%
  • तेलंगाणा - 72.8%
  • बिहार - 70.9%
  • राजस्थान - 69.7%
  • आंध्र प्रदेश - 66.4%

ग्रामीण भारताचा साक्षरता दर हा ७३.५ टक्के, तर शहरी भागातील साक्षरतेचा दर ८७.७ टक्के आहे. तसेच, देशाचा एकूण साक्षरता दर हा ७७.७ टक्के असल्याचे या अहवालात समोर आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.