ETV Bharat / bharat

दिल्ली हिंसाचार: अंकित शर्मा खून प्रकरणात ताहिर हुसेनच्या पोलीस कोठडीत वाढ - extends police custody of tahir hussain

अंकितच्या वडिलांच्या जबाबावरून दिल्ली पोलिसांनी ताहिर हुसेन विरोधात गुन्हा दाखल केला होता. अंकित शर्मा यांना ताहिर हुसेन याच्या घरात नेऊन ठार मारल्याचा आरोप आहे.

delhi-court-extends-police-custody-of-tahir-hussain-for-four-days
दिल्ली हिंसाचार: अंकित शर्मा खून प्रकरणात ताहिर हुसेनच्या पोलीस कोठडीत वाढ
author img

By

Published : Mar 17, 2020, 3:15 AM IST

नवी दिल्ली- ईशान्य दिल्लीतील हिंसाचारा दरम्यान भारतीय गुप्तचर संस्थेचे (आयबी) अधिकारी अंकित शर्मा यांचा खून झाला होता. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी ताहिर हुसेन याची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. दिल्ली न्यायालयाने याबाबत निर्णय दिला असून, 4 दिवसांसाठी त्याची कोठडी वाढवली आहे.

अंकितच्या वडिलांच्या जबाबावरून दिल्ली पोलिसांनी ताहिर हुसेन विरोधात गुन्हा दाखल केला होता. शर्मा यांना ताहिर हुसेन याच्या घरात नेऊन ठार मारल्याचा आरोप आहे.

दिल्लीत हिंसाचार पसरवण्याचा आरोप ताहिर हुसेनवर आहे. याबरोबरच गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा याच्या हत्येचा आरोपही हुसेनवर आहे. हिंसाचारनंतर पोलिसांना ताहिर हुसेन याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब आणि इतर आक्षेपार्ह साहित्य सापडले होते. त्यानंतर काही दिवस तो फरार होता. मात्र, नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

चौकशीदरम्यान हुसेन याच्या काही नातेवाईकांची नावे समोर आली आहेत. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत. हुसेन याचा भाऊ शाह आलम यालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. यासंबधीचे कॉल रेकॉर्डिंग पोलीस तपासत आहेत. दंगल सुरू होती त्या काळात ताहिरने विविध लोकांशी केलेले संभाषण पोलीस तपासत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.