नवी दिल्ली - दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मटियाला येथे रोड शो करत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने आपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
रोड शोदरम्यान मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बुधवारी झालेल्या रोड शो वेळी केजरीवाल यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते, त्यामुळे बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. आज मात्र त्यांचे हार घालून जागोजागी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.