ETV Bharat / bharat

दिल्ली दंगे: भारतातील फेसबुकच्या उपाध्यक्षाला दिल्ली विधानसभा समितीची नोटीस - भारत फेसबुक उपाध्यक्ष नोटीस

भारतातील फेसबुकचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांना दिल्ली विधानसभेच्या शांतता आणि सौहार्द समितीने नोटीस पाठवली आहे. त्यात मोहन यांना २३ सप्टेंबरला समिती समोर हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे.

फेसबुक
फेसबुक
author img

By

Published : Sep 20, 2020, 10:56 PM IST

नवी दिल्ली- फेब्रुवारी महिन्यात उत्तर पूर्व दिल्लीत दंगे घडले होते. याप्रकरणी भारतातील फेसबुकचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांना दिल्ली विधानसभेच्या शांतता आणि सौहार्द समितीने नोटीस पाठवली आहे. त्यात मोहन यांना २३ सप्टेंबरला समिती समोर हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे.

मोहन हे समितीच्या मागील बैठकीत उपस्थित नव्हते. त्यामुळे, समितीतर्फे यंदा बैठकीला उपस्थित राहण्याची ताकीद देण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष आम आदमी पक्षाचे आमदार राघव चड्डा आहेत. मोहन यांनी नोटीसची अवमानना केल्यास ते समितीला मिळालेल्या घटनात्मक हमी सुविधांचे उल्लंघन समजले जाईल, असे आज समितीने आपल्या निवेदनात सांगितले आहे.

मोहन यांनी समितीच्या बैठकीला बगल दिल्यास तो दिल्ली विधानसभा, तसेच राष्ट्रीय राजधानीतील जनतेचा अवमान असेल, असे चड्डा यांनी सांगितले. तसेच, ज्या प्रकारे फेसबुकने संसदेच्या स्थायी समितीला सहकार्य केले, त्याचप्रमाणे दिल्ली विधानसभेच्या कार्यवाहीला देखील त्यांनी योग्य प्रतिसाद द्यावा, असे आवाहन चड्डा यांनी केले.

दिल्ली दंग्याप्रकरणी फेसबुकवर आरोप लावण्यात आले आहेत. त्यामुळे, फेसबुकचे प्रतिनिधी म्हणून मोहन यांनी लावलेल्या आरोपांबद्दल स्पष्टीकरण देऊन लोकांचा फेसबुकवरील विश्वास टिकवून ठेवावा, असे निवेदनात सांगण्यात आले आहे.

भारतातील फेसबुकच्या धोरणाची अमलबजावणीची जबाबदारी असणाऱ्या एका अधिकाऱ्याने भाजपमधील एका नेत्यावर बंदी आणण्याच्या कार्यात हस्तक्षेप केल्याचा दावा वॉल स्ट्रिट जर्नलने एका अहवालातून केला होता. या नेत्याने समाज माध्यमावर समाजमन भडकवाऱ्या पोस्ट टाकल्याचे अहवालात सांगण्यात आले होते. या अहवालाच्या पार्श्वभूमीवरच सदर समिती समक्ष सुनावणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

हेही वाचा- ''रायडू-चावला लो प्रोफाईल क्रिकेटपटू'', मांजरेकर पुन्हा ट्रोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.