डेहराडून - देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन सारख्या खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या जात आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी पाळणे थोडे अवघड जात आहे. त्यासाठी आयआयटी रुरकीच्या एका शास्त्रज्ञांनी शब्बीर अहमद यांनी एक नवीन प्रकारचे हँडवॉश युनिट तयार केले आहे. या युनिटला हातांनी नाहीतर पायांनी चालवता येणार आहे.
कोरोनाच्या काळात एक दुसऱ्यांपासून सुरक्षित अंतर राखण्यासोबत स्वच्छतेच्या सूचनादेखील दिल्या जात आहेत. एखाद्या वस्तूला स्पर्श केल्यानंतर हात साबण किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुतल्यास कोरोनाचा संसर्ग टाळण्यास मदत होते. तसेच सार्वजनिक ठिकाणी हात धुताना अनेकजण एकच नळ वापरत असतात. त्यामुळे हातानं वॉश युनिट हाताळल्यास संसर्ग होण्याचा धोका असतो. मात्र, पायांनी उपकरण हाताळल्यास संसर्ग धोका कमी होतो. त्यासाठी अंत्यत कमी खर्चामध्ये त्यांनी उपकरण तयार केले आहे. यामध्ये तुम्ही पायांनी पाणी आणि दुसऱ्या हातांना साबण किंवा शाम्पू काढू शकता.
असे काही उपकरण बाजारामध्ये आधीच उपलब्ध आहेत. मात्र, हे एक नाविण्यपूर्ण शोध असल्याचे शब्बीर म्हणाले. तसेच या उपकरणाला दोन व्यक्ती उचलून कुठेही ठेवू शकतात. याची लांबी २२ इंच, लांबी २ फूट आहे, तर वजन २५ किलो आहे विशेष म्हणजे या उपकरणाला वीजेची गरज नसल्याचे शब्बीर यांनी सांगितले.