ETV Bharat / bharat

ऑपरेशन वेस्ट एंड : समता पक्षाच्या माजी अध्यक्षा जया जेटलींना चार वर्षांची शिक्षा

२००० साली तहलका डॉट कॉम नावाच्या एका पोर्टलने स्टिंग ऑपरेशन करत भ्रष्टाचार उघड केला होता. ऑपरेशन वेस्ट एंड असे या ऑपरेशनचे नाव होते. यासंदर्भात सीबीआयने २००६ला चार्जशीट दाखल केली होती. तर, २०१२ला न्यायालयाने या प्रकरणातील तीन आरोपींवर भ्रष्टाचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले होते.

author img

By

Published : Jul 30, 2020, 4:53 PM IST

Defence corruption case: Court awards 4-yr jail to ex-Samata Party chief Jaya Jaitley, 2 others
ऑपरेशन वेस्ट एंड : समता पक्षाच्या माजी अध्यक्षा जया जेटलींना चार वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली : समता पक्षाच्या माजी अध्यक्षा जया जेटली यांना दिल्लीच्या रोज अव्हेन्यू न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ऑपरेशन वेस्ट एंड नावाच्या एका स्टिंग ऑपरेशनच्या आधारे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासमवेत इतर आरोपींनाही प्रत्येकी चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

२००० साली तहलका डॉट कॉम नावाच्या एका पोर्टलने स्टिंग ऑपरेशन करत भ्रष्टाचार उघड केला होता. ऑपरेशन वेस्ट एंड असे या ऑपरेशनचे नाव होते. यासंदर्भात सीबीआयने २००६ला चार्जशीट दाखल केली होती. तर, २०१२ला न्यायालयाने या प्रकरणातील तीन आरोपींवर भ्रष्टाचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले होते.

आज या प्रकरणातील आरोपींना शिक्षा जाहीर करण्यात आली. विशेष सीबीआय न्यायाधीश विरेंद्र भट यांनी जया जेटली, गोपाल पाचेरवाल आणि मेजर जनरल (नि.) एस. पी. मुर्गई यांना याप्रकरणी प्रत्येकी चार वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच या तिघांवर प्रत्येकी एक लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला. त्यांना गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शरण येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा : भारत-बांगलादेश संबंधांचा ‘सुवर्ण अध्याय’ संपुष्टात येतोय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.