नवी दिल्ली - भारतीय हवामान विभाग(IMD) आणि ऑल इंडिया रेडिओ आता पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील(Pok) हवामाना स्थितीचं प्रसारण करणार आहे. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये याच माहितीचा समावेश करण्यात येणार आहे. पिओकेमधील मिरपूर, गिलगिट, मुझ्झफराबाद या मोठ्या शहरांमधील हवामानाच्या घडामोडींसह पाकव्याप्त काश्मीरमधील प्रत्येक कानाकोपऱ्यातील परिस्थिती सर्व भारतीयांपर्यंत पोहचणार आहे.
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे, असे समजून ही सेवा सुरू केली असल्याने पाकिस्तानचा त्यामुळे नक्कीच जळफळाट होईल. काश्मीर हवामान विभागात पीओके हवामान सेवेचा अधिकृत समावेश करण्यात आला आहे.
सरकारी वृत्त वाहिन्यांनी पाकव्याप्त काश्मीरातील तापमानाची माहिती देणं सुरू केले आहे. मात्र, पुढे खासगी वाहिन्याही ही सेवा सुरू शकतात, असे माहिती प्रसारण मंत्रालयातील सुत्रांनी सांगितले आहे. उन्हाळा असल्याचे सर्वच भागांतील तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे एका प्रादेशिक विभागाचा सर्वंकष आढावा घेण्यावर आमचा भर आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले.
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन होऊन दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्यात आले, तेव्हापासून पाकव्याप काश्मीरमधील हवामानाची माहिती आम्ही देत आहोत, असे हवामान विभागाचे संचालक एम. मोहापात्रा यांनी सांगितले. मात्र,आता अधिकृतरित्या काश्मीर विभागात या सेवेचा समावेश करण्यात आला आहे.