ETV Bharat / bharat

छत्तीसगड : चार जणांच्या हत्येप्रकरणातील नक्षलवादी पोलिसांना शरण

भीमा मारकाम हा 22 वर्षीय नक्षलवादी दंतेवाडा जिल्ह्यातील काटेकल्याण येथील रहिवासी आहे. त्याच्यावर 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

शरण नक्षलवादी
शरण नक्षलवादी
author img

By

Published : Jul 1, 2020, 1:05 PM IST

दंतेवाडा (छत्तीसगड) – दूरदर्शनचे कॅमेरामन आणि तीन पोलिसांच्या हत्येप्रकरणातील नक्षलवादी हा छत्तीसगड पोलिसांना आज शरण आला आहे. या नक्षलवाद्याने ऑक्टोबर 2018 मध्ये चार जणांची हत्या केली होती. भीमा मारकाम असे या 22 वर्षीय नक्षलवाद्याचे नाव आहे.

भीमा मारकाम हा 22 वर्षीय नक्षलवादी दंतेवाडा जिल्ह्यातील काटेकल्याण येथील रहिवासी आहे. त्याच्यावर 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. दंतेवाडाचे पोलीस अधीक्ष अभिषेक पल्लव म्हणाले, की 2019 मध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ला करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांच्या टीममध्ये भीमा हादेखील सहभागी होता. हा नक्षलवादी हा मलांगीर क्षेत्र समितीच्या 24 क्रमांकाच्या तुकडीमध्ये होता. तो नक्षलवादी कारवायांमध्ये 2014 मध्ये सहभागी झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.