ETV Bharat / bharat

छत्तीसगडमध्ये अजित जोगींची माघार; बसप लढवणार सर्व जागा तर गौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश

लोकसभा निवडणुकांना फारच कमी कालावधी उरलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरातील पक्ष संपूर्ण ताकदीनीशी निवडणुकीची तयारी करत आहेत. आज दिवसभरात राष्ट्रीय राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चांचा धावता आढावा..

लोकसभा मतकंदन
author img

By

Published : Mar 22, 2019, 6:54 PM IST

Updated : Mar 23, 2019, 12:02 AM IST

छत्तीसगड लोकसभा निवडणूक : अजित जोगींची माघार, बसप सर्व जागा लढवणार

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि छत्तीसगड जनता काँग्रेसचे (सीजेसी) प्रमुख अजित जोगी यावेळी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी जोगी आपल्या पक्षाला लोकसभा निवडणुकीपासून लांब ठेवण्याच्या विचारात आहेत. यामुळे छत्तीसगड लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्येच मुख्य लढत राहणार आहे.

३०० दहशतवादी मारले तर जगाला का दिसले नाही? सॅम पित्रोदांचा 'एअर स्ट्राईकवर' सवाल

काँग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतीय वायु सेनेने हवाई हल्ल्यामध्ये ३०० दहशतवाद्यांना मारले हे अत्यंत स्तुत्य आहे. मात्र, आकड्यांवर आपल्याकडे काही पुरावे आहेत का? भारतीय सेनेने पाकिस्तानला किती प्रमाणात नेस्तनाभूत केले याची माहिती घेण्याचा नागरिकांना अधिकार आहे, असे थेट प्रश्न पित्रोदा यांनी केला आहे. त्यानंतर मात्र देशातील राजकारण तापले. वाचा सविस्तर

काँग्रेसवर 'सर्जिकल स्ट्राईक' करा; पित्रोदांच्या प्रश्नानंतर भाजपचे जनतेला आवाहन

काँग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजपनेही प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्षांनी भारतीय वायु दलाचा पुन्हा अपमान केला आहे. भारतीयांनो त्यांच्या अशा वक्तव्यावर आपण त्यांना प्रश्न विचारा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. निवडणुकांमध्ये तुमच्या मतदानाच्या शक्तिने काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक करा, अशा शब्दात अमित शाह यांनी जनतेला आवाहन केले आहे. वाचा सविस्तर

भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे छत्तीसगड येथील सुमित्रा मारकोले या महिला आमदार करणार बंडखोरी

कांकेर विधानसभा क्षेत्रामधून त्या एकेकाळी भाजपच्या आमदार राहिलेल्या आहेत. मात्र, यावेळी भाजपने जुन्या नेत्यांना उमेदवारी देणे टाळले आहे. त्यात सुमित्रा यांचाही नंबर लागल्याचे समजते. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये यांचे नाव नाही. तसेच त्यांच्या मतदार संघामधून पक्षाने दुसऱ्याच व्यक्तीला उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे सुमित्रा संतापल्या आहेत. त्यानंतर त्यांनी भाजपविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. वाचा सविस्तर

भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर अखेर भाजपमध्ये दाखल

भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने अखेर आज भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. दिल्लीतून गंभीर भाजपसाठी लोकसभेची निवडणूक लढवण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.अरुण जेटली आणिरविशंकर प्रसादयांच्याप्रमुख उपस्थित गंभीरने भाजपमध्ये प्रवेशकेला. वाचा सविस्तर

लोकसभा रणसंग्राम : बसपच्या ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

बहुजन समाज पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. गौतम बुद्धनगर येथून सतबीर नागरमधून बसपकडून लढतील. वाचा सविस्तर

Intro:Body:

ENTERTAINMENT 

Conclusion:
Last Updated : Mar 23, 2019, 12:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.