ETV Bharat / bharat

LIVE Fani Cyclone: 'फनी' चक्रीवादळाचा तडाका सुरूच, विविध ठिकाणी ५ जणांचा मृत्यू - odisa

भुवनेश्वर- सायक्लोन फनी चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घातला आहे. या वादळामुळे पुरी, भुवनेश्वरसह किनारपट्टीवरील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. ओडिशाच्या  दक्षिण किनाऱ्यालगत आणि आंध्रप्रदेशच्या उत्तर किनाऱ्यालगत असलेल्या सागरी भागात फनी वादळाचा जोर अधिक आहे. साइक्लोन फनी  चक्रीवादळामुळे ओडिशामधील जवळजवळ १ दशलक्ष लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. या वादळाचा प्रभाव उत्तर प्रदेश गेला असून तेथे एकाचा मृत्यू झाला आहे. तर ओडिशात ५ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

सायक्लोन फनी चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घातला आहे.
author img

By

Published : May 3, 2019, 8:30 AM IST

Updated : May 3, 2019, 6:43 PM IST

Live Update

  • ओडिशा : ओडिशात फनी चक्रीवादळाचा तडाका सुरूच आहे. दरम्यान राज्याच्या विविध ठिकाणी ५ जनांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. चक्रीवादळ थांबल्यानंतर या बातमीची संपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे.
  • ओडिशा: नायापल्ली येथे फनी वादळाच्या तडाख्याने अनके झाडे उन्मळून पडली आहेत. स्थानिक पोलिसांनी रस्त्यावर पडलेली ही झाडे हटवण्याचे काम सुरू केले आहे. तसेच प्रदीप जिल्ह्यातील निवारगृहात लोकांना अन्न तसेच इतर साहित्य वाटप करण्यात येत आहे.
  • भारतीय नौदलाच्या पी -8 आय विमान आणि डोर्नियरच्या मदतीने फनी वादळामुळे किनारीपट्टी भागात झालेल्या परिणामा चे सर्वक्षण करण्यात येणार आहे.
  • पुढील तीन तासात फनी वादळाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेगही कमी होऊन १५०- १६० प्रतितास होण्याची शक्यता आहे. त्यांनतर हे वादळ उत्तर तसेच उत्तर-पूर्व ओडिशामार्गे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. सांयकाळी आडिशाच्या उत्तर भागात फनीचा जोर वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे दिल्ली येथील अधिकारी मृत्यूंजय मोहपात्रा यांनी दिली. तसेच आंध्र प्रदेशपासून हे वादळ दुर गेले असून या वादळाचा तीन जिल्ह्याला तडाखा बसला आहे.असेही मोहपात्रा यांनी सांगितले
  • फनी वादळाच्या प्रभावामुळे ओडिशाच्या भाद्रक येथे प्रतिकूल समुदी हवामान.
  • आंध्रप्रदेश: लोकांनी श्रीककुलम जिल्ह्यातील इचचपुरम शहरातील निवारा केंद्रात आश्रय घेतला आहे. श्रीककुलम जिल्ह्यात आज सकाळपासून वादळीवाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे बऱ्याच घरांचे नुकसान झाले आहे.
  • ओडिशा: फनी वादळ पुरी किनारपट्टीला धडकल्यानंतर गंजम जिह्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस. वाऱ्याचा वेग १७५ किमी प्रति तास.
  • आंध्रप्रदेश: विशाखापट्टणममध्ये वायुदलाचे 13 विमान वादळ ग्रस्तांच्या मदतीसाठी आणि मदत साहित्या वितरण करण्यासाठी सज्ज.
  • ओडिशातील पुरी येथे वाऱ्याचा वेग २४० ते २४५ प्रति तास असल्याची आणि मुसळधार पाऊस पडणार असल्याची भारतीय हवामान खाते हैदराबाद यांची माहिती. ओडिशानंतर फॅनी वादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार.
  • फॅनी वादळ सकाळी ८ वाजता समुद्रातून जमिनीवर दाखल झाले असून (लँड फॉल) २ तास या वादळाचा प्रभाव राहील. त्यानंतर हे वादळ उत्तर तसेच उत्तर-पूर्व ओडिशामार्गे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्याता आहे. ओडिशातील किनार पट्टीवरील जिल्ह्यांना या वादळाचा तडाखा बसणार आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत वाऱ्याचा वेग ३५ किमी प्रति तास होता. अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे प्रदीप येथील अधिकारी आर. शुक्ला यांनी दिली.
  • आंध्रप्रदेश: श्रीककुलम जिल्ह्याच्या कोट्टुरू मंडळ येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून (एनडीआरएफ) मदतकार्य सुरू.

आज पहाटे 4:30 वाजता, अत्यंत तीव्र असलेले "फनी" चक्रीवादळ १८.९० एन अक्षांशाजवळ आणि उत्तरपश्चिमेवरील ८५.४० ई रेखांशाजवळ तसेच पुरीच्या दक्षिण-पश्चिमी भागापासून 80 किमी असलेल्या बंगालच्या पश्चिम-मध्य खाडीजवळ केंद्रीत झाले होते. ओडिशाच्या दक्षिण किनाऱ्यालगत आणि आंध्रप्रदेशच्या उत्तर किनाऱ्यालगत असलेल्या सागरी भागात फनी वादळाचा जोर अधिक आहे. आडिशाच्या गोपालपूरमध्ये १४० मिमी, पुरी येथे ९० मिमी आणि कलिंगापट्टणममध्ये ९० मिमी पाऊस पडला. गोपालपूरमध्ये आज सकाळी ७.३० वाजता ५७ नॉट्स (१०५ किमी) इतकी वायु गती होती. पुरी, भुवनेश्वर, गोपालपूर, चंदबली आणि परदीप याठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. साइक्लोन फनी चक्रीवादळामुळे ओडिशामधील जवळजवळ १ दशलक्ष लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

आंध्रप्रदेशात किनारपट्टी भागातील श्रीकुलम येथे आज सकाळफासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. दरम्यान नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. तर, त्यांच्यासाठी गरजेच्या सर्व वस्तुंची उपब्धतात करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनीही उच्च स्तरीय बेठक घेऊन चक्रीवादळाच्या परिणामांचा आणि व्यवस्थेचा गुरुवारी आढावा घेतला. वादळ धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन ओडिशा प्रशासनाने शुक्रवारी किनारपट्टी भागातील सर्व शाळा, महाविद्यालयांना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर विमान प्राधिकरणांना सावधानतेचा इशारा दिला आहे. केंद्रीय मंत्री सुरेश गोयल यांनीही फनी चक्रीवादळाला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 3, 2019, 6:43 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.