ETV Bharat / bharat

बिहारच्या त्या 'सायकल गर्ल'ला मिळाला प्रशिक्षक; वरिष्ठ पोलीस अधिक्षकांनी केली नियुक्ती - दरभंगा सायकल गर्ल

लॉकडाऊनच्या कालावधीत मोहन पासवान यांना खाण्या-पिण्यासाठी पैशांची चणचण भासू लागली. भाड्याचे घर असल्याने घरमालकही त्यांच्यामागे तगादा लावला होता. त्यावेळी ज्योतीजवळ काही पैसे उरले होते. या पैशांनी तिने एक जुनी सायकल खरेदी केली आणि आपल्या वडिलांना या सायकलवर बसवून चक्क दरभंगा येथे पोहोचली होती.

cycle trainer provided to Jyoti by ssp of darbhanga
बिहारच्या त्या 'सायकल गर्ल'ला मिळाला प्रशिक्षक; वरिष्ठ पोलीस अधिक्षकांनी केली नियुक्ती
author img

By

Published : Jul 11, 2020, 11:32 AM IST

दरभंगा (बिहार) - लॉकडाऊन दरम्यान काही दिवसांपूर्वी एका मुलीने आपल्या आजारी वडिलांना गुरुग्राम येथून सायकलवर बसवून थेट दरभंगा येथे पोहोचविले होते. ज्योतिकुमारी असे या मुलीचे नाव आहे. या मुलीने आपल्या नातेवाईकांसह एसएसपी बाबुराम यांची भेट घेतली. यावेळी एसएसपी यांनी ज्योतीचे वडील मोहन पासवान यांच्यासोबत ज्योतीच्या भविष्याबाबत चर्चा केली.

बिहारच्या त्या 'सायकल गर्ल'ला मिळाला प्रशिक्षक; वरिष्ठ पोलीस अधिक्षकांनी केली नियुक्ती

यावेळी ज्योतीची साईकलिंगची आवड पाहून एसएसपी बाबूराम यांनी संजीव कुमार नावाच्या एका सायकल प्रशिक्षकाला बोलावले आणि ज्योतीच्या सायकलच्या प्रशिक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. यानंतर ही सायकल गर्ल खूप आनंदीत झाली.

सायकलने पोहोचविले होते वडिलांना दरभंगा -

लॉकडाऊनच्या कालावधीत मोहन पासवान यांना खाण्या-पिण्यासाठी पैशांची चणचण भासू लागली. भाड्याचे घर असल्याने घरमालकही त्यांच्यामागे तगादा लावला होता. त्यावेळी ज्योतीजवळ काही पैसे उरले होते. या पैशांनी तिने एक जुनी सायकल खरेदी केली आणि आपल्या वडिलांना या सायकलवर बसवून चक्क दरभंगा येथे पोहोचली होती.

तर तिच्या या सायकलवरील प्रवासादरम्यान, आपल्या आजारी वडिलांना घेऊन जात असल्यामुळे अनेक लोकांनी तिला मदत केली. दुसरीकडे माध्यमांद्वारे ही बातमी सायकल फेडरेशन ऑफ इंडियाला माहीत झाल्यानंतर त्यांनी ज्योतीला ट्रायलसाठी दिल्ली येथे बोलाविले.

एसएसपी यांनी ज्योतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, जर ज्योतीला चांगले प्रशिक्षण मिळाले तर ती भविष्यात चांगली सायकल रेसर होऊ शकते. ज्योतीचे प्रशिक्षक संजीव कुमार स्पोर्ट्स कोट्यातून कला सांस्कृतिक विभागात लिपीक पदावर कार्यरत आहेत. तसेच जोपर्यंत तिला एखाद्या स्पोर्ट्स अॅकॅडमीमध्ये प्रवेश मिळत नाही तोपर्यंत ते तिला प्राथमिक प्रशिक्षण करावे, ज्यामुळे तिला राष्ट्रीय स्तरावर जायला मदत व्हायला हवी, असे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

तसेच यावेळी वरीष्ठ पोलीस अधीक्षक बाबूराम यांनी ज्योतीच्या वडिलांना विश्वास दिला की, कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास आमच्याशी संपर्क करावा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.