नवी दिल्ली - सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू झाली आहे. ही बैठक सुरू झाल्यानंतर कर्नल बी. संतोष बाबू तसेच लडाखच्या गलवान खोऱ्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.
यावेळी सोनिया गांधी यांनी सांगितले की, भारत सध्या कोरोनाच्या संकटात सापडला आहे. लाॅकडाऊनमुळे आर्थिक संकटही आले आहे, त्यातच सध्या चीन, नेपाळ सीमेवरील तणावाचा भारत सामना करीत आहे. मात्र, या संकटांसाठी भाजपा सरकार जबाबजार असल्याची टीकाही सोनिया गांधी यांनी केली.
लडाखमधील गलवान खोऱ्यात गेल्या सोमवारी रात्री आणि मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. तर चीनचे जवळपास ४३ जवान ठार झाले, तसेच त्यांचे अनेक जवान गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येते.