नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचारात सहभाग असलेल्या प्रत्येकाला शिक्षा देण्यात येणार असून तो कोणत्याही पक्षाचा किंवा धर्माचा आहे, याचा विचार केला जाणार नाही, असे आज गृहमंत्री अमित शाह म्हणाले. तसेच शाह यांनी सीएए, एनपीआर आणि न्यायाधीश एस. मुरलीधर यांच्या बदलीवरही भाष्य केले.
-
Union Home Minister Amit Shah in Rajya Sabha: The culprits, they may be of any religion, caste or party, they will not be spared. They will be brought before the law. #DelhiViolence pic.twitter.com/cyZsosdoaB
— ANI (@ANI) March 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Union Home Minister Amit Shah in Rajya Sabha: The culprits, they may be of any religion, caste or party, they will not be spared. They will be brought before the law. #DelhiViolence pic.twitter.com/cyZsosdoaB
— ANI (@ANI) March 12, 2020Union Home Minister Amit Shah in Rajya Sabha: The culprits, they may be of any religion, caste or party, they will not be spared. They will be brought before the law. #DelhiViolence pic.twitter.com/cyZsosdoaB
— ANI (@ANI) March 12, 2020
दिल्ली हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत तब्बल 700 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दंगल पेटवणाऱ्या आरोपींची ओळख पटवण्यासाठी मतदान कार्ड आणि चालक परवान्याचा वापर करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी 40 पेक्षा अधिक दल स्थापन केले असून ते रात्रं-दिवस काम करत असल्याचे शाह यांनी सांगितले.
दरम्यान, अमित शाह यांनी यावेळी सीएएवर भाष्य केले. सीएए हा कायदा नागरिकत्व हिसकावणारा नाही, तर नागरिकत्व देणारा कायदा आहे. सीएए कायद्याविषयी चुकीची माहिती पसरवण्यात येत आहेत, असे शाह म्हणाले.
दिल्ली हिंसाचारप्रकरणातून भाजप नेत्यांना वाचविण्यासाठी न्यायाधीश एस. मुरलीधर यांची अचानक बदली करण्यात आल्याचा आरोप विरोधीपक्षाकडून केंद्र सरकारवर करण्यात आला. मात्र, एस. मुरलीधर यांची बदली ही कॉलेजियमच्या शिफारसीवर करण्यात आल्याचे स्पष्टीकरण शाह यांनी दिले आहे.