ETV Bharat / bharat

देशभरातील काश्मिरी जनतेसाठी सीआरपीएफ 'मददगार' - ट्वीटर

पुलवामा घटनेनंतर राज्याबाहेर राहणाऱ्या काश्मिरी जनतेला धमकी देण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे काश्मिरींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मददगार
author img

By

Published : Feb 17, 2019, 12:23 PM IST

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर काश्मिरच्या बाहेर राहणाऱ्या काश्मिरी जनतेला धमकी देण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे संबंधित काश्मिरी लोकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. या लोकांसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. या हेल्पलाईनला 'मददगार' असे नाव देण्यात आले आहे. पीडित नागरिक यावर संपर्क साधून तक्रार नोंदवू शकतात.

काश्मिरमधील अनेक विद्यार्थी देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेतात. तसेच, अनेक ठिकाणी नोकरीसाठीही राहतात. पुलवामा हल्ल्यानंतर या लोकांना धमकी दिल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे साहजिकच या नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षितता पसरली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सीआरपीएफने ही हेल्पलाईन सुरू केली आहे.

मददगारद्वारे एक ट्वीट करण्यात आले आहे. यात म्हटले आहे, की काश्मिरी लोक ट्वीटर हँडल '@सीआरपीएफमददगार'वर संपर्क करू शकतात. तसेच, टोल फ्री क्रमांक १४४११ किंवा ७०८२८१४४११ वर एसएमएसही करू शकतात. कोणताही त्रास असेल, तरी सीआरपीएफकडून त्वरीत मदत देण्यात येईल, असे सीआरपीएफने म्हटले आहे.

Intro:Body:

देशभरातील काश्मिरी जनतेसाठी सीआरपीएफ 'मददगार'

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.