ETV Bharat / bharat

पहिल्या टप्प्यात महिलांवर अत्याचार करणारेही रिंगणात; गंभीर गुन्ह्यात भाजपचेही उमेदवार

भाजपने ३६ टक्के अशा उमेदवारांना उमेदवारी दिली आहे, ज्यांच्यावर सामान्य गुन्हे दाखल आहेत. तर १९ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत. भाजप पाठोपाठ तेलगू राष्ट्र समिती, बहुजन समाज पक्ष आणि तेलगू देशम पक्ष यांचा क्रमांक लागतो.

सांकेतिक छायाचित्र
author img

By

Published : Apr 7, 2019, 2:55 PM IST

नवी दिल्ली - देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी केवळ ४ दिवस शिल्लक आहेत. तर, संपूर्ण देशभरातून तब्बल १ हजार २७९ उमेदवार पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवत आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटीक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज तपासून त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यावर एक नजर टाकू.

कोणत्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात ?

पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय स्तरावरील पक्षांचे एकूण २२७ उमेदवार रिंगणात आहेत. तर स्थानिक पक्षांचे १२५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तसचे नोंदणीकृत मात्र मान्यता प्राप्त नसलेल्या पक्षांचे एकून ३६८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. सर्वात जास्त उमेदवार हे स्वतंत्र लढत आहेत त्यांची एकूण संख्या ५५९ आहे. या एकूण उमेदवारांपैकी १२६६ उमेदावारांचे शपथपत्र एडीआरने तपासून पाहिले. जे उमेदवार यातून सुटले त्यांचे शपथपत्र रिकामे किंवा व्यवस्थित नसल्यामुळे त्यांची आकडेवारी मांडता आली नाही.

chart
पक्षांचे उमेदवार रिंगणात (टक्क्यांमध्ये)

हे आहेत गुन्हे -

पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांपैकी २१३ म्हणेज १७ टक्के उमेदवार यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. तर १४६ म्हणजेच १२ टक्के उमेदवार असे आहेत ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. १२ उमेदवारांवर दोष सिद्ध झाले आहेत. तर, १० उमेदवारांवर हत्येचे गुन्हे दाखल आहेत. २५ उमेदवारांनी हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. आणि एकूण उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे.

chart
गुन्ह्यांचे प्रकार

महिलांवर अत्याचार करणारेही रिंगणात -

एडीआरने प्रसिद्ध केलेल्या अहवलानुसार महिलांवर अत्याचार करणारे उमेदवारही रिंगणात आहेत. या उमेदवारांमध्ये १६ उमेदवार असे आहेत ज्यांच्यावर बलात्कारासारखे गुन्हे दाखल आहेत. तर, काही उमेदवारांवर महिलांचा विनयभंग केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. म्हणजे १.२ टक्के उमेदवार हे महिलांवर अत्याचार करणारे आहेत, असे सिद्ध होते. यापैकी काही उमेदवारांनी तर महिलांचे पती आणि त्यांच्या कुटुंबीयांवर क्रुर अन्याय केल्याचेही गुन्हे दाखल आहेत.

हा पक्ष आघाडीवर -

गुन्हे असणारे उमेदवार कोणत्या पक्षात जास्त आहेत हे पडताळून पाहिल्यास धक्का दायक बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये वायएसआर ('युवाजन श्रमिक रायतू') काँग्रेस हा दक्षिणेतील पक्ष आघाडीवर आहे. या पक्षातील तब्बल तब्बल ५२ टक्के उमेदवार असे आहेत ज्यांच्यावर वरील गुन्हे दाखल आहेत. आणि ४० टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसपक्ष आहे. एकूण उमेदवारांच्या ४२ टक्के उमेदवारांवर गुन्हे नोंदवले आहेत. तर २७ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

यानंतर भाजपने ३६ टक्के अशा उमेदवारांना उमेदवारी दिली आहे, ज्यांच्यावर सामान्य गुन्हे दाखल आहेत. तर १९ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत. भाजप पाठोपाठ तेलगू राष्ट्र समिती, बहुजन समाज पक्ष आणि तेलगू देशम पक्ष यांचा क्रमांक लागतो.

Chart
पक्षांनी गुन्हेगारांना उमेदवारी दिलेला आकडा (सौ. एडीआर)

या आकड्यांवर नजर टाकली तर वायएसआरसीपी या पक्षाचे २५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी १३ उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तर १० उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसच्या एकूण ८३ उमेदवारांपैकी ३५ उमेदवारांवर गुन्हे तर २२ उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारांना उमेदवारी देण्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपच्या ८३ उमेदवारांपैकी ३० उमेदवार गुन्ह्याखाली आहेत. तर १६ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत.

Intro:Body:

काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या आक्षेपानंतर प्रचाराच्या गाण्यातून 'त्या' ओळी हटवल्या
नवी दिल्ली - निवडणूक आयोगाच्या आक्षेपानंतर काँग्रेसच्या प्रचाराच्या गाण्यातून काही ओळी हटवण्यात आल्या आहेत. या ओळींमुळे 'निश्चितपणे समाजिक शांतता आणि सलोखा नष्ट होईल,' तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यामुळे आयोगाने यावर आक्षेप घेतला. काँग्रेसने आता या ओळी आणि ही कडवी गाण्यातून काढून टाकली आहेत.
या गाण्यातून काँग्रेसने आश्वासन दिलेल्या किमान उत्पन्न योजनेविषयी (NYAY - न्यूनतम आय योजना) सांगण्यात आले होते. 'केंद्रातील रालोआ सरकारने द्वेष पसरवण्याचे काम केले आहे. तसेच, विविध संप्रदायांना एकमेकांविरोधात चिथावले आहे,' असे या ओळींमध्ये म्हटले होते. काँग्रेसच्या दोन्ही गाण्यांमध्ये हे बदल करण्यात आले आहेत.
काँग्रेसने 'अब होगा न्याय' अशा आशयाचे गाणे प्रसिद्ध केले होते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशातील २० टक्के गरिबांना वर्षाला ७२ हजारांचे किमान उत्पन्न मिळवून देण्यात येईल, असे म्हटले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.